नवीन परीक्षा पद्धतीबाबत मार्गदर्शन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

सातारा  - "सकाळ विद्या' व "क्रिएटिव्ह ऍकॅडमी'ने सातवी ते नववीत शिकणाऱ्या, तसेच दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य चर्चासत्र आयोजित केले आहे. शनिवारी (ता. 14) सकाळी साडेदहा वाजता येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या सभागृहात हे चर्चासत्र होईल. 

दहावीच्या परीक्षेतील गुण मुलांच्या करिअरची दिशा ठरवतात. पुढील वर्षापासून राज्य बोर्डाची परीक्षा पद्धत व अभ्यासक्रमामध्ये बदल होत आहे. पालक व मुलांत त्याविषयी संभ्रम आहे. या विशेष चर्चासत्रात पुढील वर्षीचा (2019-20) दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षांचा पॅटर्न, बदललेला अभ्यासक्रम, नवीन शैक्षणिक धोरणाविषयी माहिती मिळेल. दहावीनंतर कला, शास्त्र, वाणिज्य शाखांची निवड अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या आयआयटी-जेईई, नीट, सीईटी अशा प्रवेश परीक्षा, त्यांचा अभ्यासक्रम व बदललेले स्वरूप त्याचबरोबर सातवीपासूनच या परीक्षांची तयारी, दहावी- बारावीनंतर अभियांत्रिकी व मूलभूत विज्ञान शाखेतील करिअरचे विविध पर्याय, संधी, नेमक्‍या पर्यायाची निवड, आयआयटी, एनआयटी, बीट्‌स, व्हीआयटी, आयआयएससी, आयसर, एनआयएससीआरसारख्या देशातील नामांकित शिक्षण संस्था व त्यांच्या प्रवेशप्रक्रियांबाबत प्रा. एन. ए. शेख मार्गदर्शन करतील. 

कधी - शनिवार, 14 एप्रिल 
केव्हा - सकाळी 10.30 वाजता 
कोठे - यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेज सभागृह, सातारा 
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : 9922913345 
विद्यार्थी व पालकांसाठी प्रवेश विनामूल्य 

Web Title: satara news Guidance for new examination methods