हेल्मेटसक्ती विरोधात सह्यांची मोहीम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

सातारा - हेल्मेटसक्तीमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधींनीही शहर व ग्रामीण भागात या सक्तीला विरोध दर्शविला आहे. सक्तीचा दिवस जवळ येईल तसा नागरिकांच्या प्रतिक्रियांचा पारा आणखी चढत आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समूहाने तर, रस्त्यावर उतरून हेल्मेटसक्ती विरोधात आज सह्यांची मोहीम सुरू केली. 
शहर व ग्रामीण भागात हेल्मेटसक्तीच्या निर्णयाचा पोलिस दलाने फेरविचार करावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

सातारा - हेल्मेटसक्तीमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधींनीही शहर व ग्रामीण भागात या सक्तीला विरोध दर्शविला आहे. सक्तीचा दिवस जवळ येईल तसा नागरिकांच्या प्रतिक्रियांचा पारा आणखी चढत आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समूहाने तर, रस्त्यावर उतरून हेल्मेटसक्ती विरोधात आज सह्यांची मोहीम सुरू केली. 
शहर व ग्रामीण भागात हेल्मेटसक्तीच्या निर्णयाचा पोलिस दलाने फेरविचार करावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

अवैध धंदे बंद करण्याचे आव्हान स्वीकारा
कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांची कारकीर्द अत्यंत अपयशी ठरली आहे. संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंदे सुरू आहेत. त्यातून गुन्हेगारी प्रचंड वाढत आहे. त्यामुळे ते कधी सायकलवरून प्रवास करत तर, कधी हेल्मेटचा विषय काढून अपयश लपवत आहेत. फलटणला तर उच्चांक गाठलेला आहे. नो पार्किंगवर कारवाई करणे बंद करण्याचा ठराव पालिकेने दिला असतानाही बेकायदेशीर मोहीम चालवून जनतेला त्रास दिला जात आहे. एवढे लोक अवैध दारू व मटका बंद करा म्हणत असताना आपण कशाची वाट पाहात आहात. आपण हे आव्हान स्वीकारत का नाही.

न्यायालयाने हेल्मेटबाबत सांगितलेले आहे म्हणता, मग न्यायालयाने काय 
मटका, दारू आणि सावकारी करून गुन्हे करायला पण सांगितले आहे का, जमत नसेल तर राजीनामा द्या. परंतु, जनतेला त्रास देऊ नका.
- ॲड. संदीप लोंढे, फलटण

सामान्य माणूस असंघटित असल्याने...
संघटित मीटर न टाकणारे रिक्षावाले, राजवाडा पदपथावर पार्किंग करणारे व्यापारी, भाजीवाले, फळगाड्या, डॉल्बीवाले, फ्लेक्‍सवाले यांच्यावर ठोस कारवाई होत नाही. सर्रास ट्रीपलसिट, कर्णकर्कश्‍य हॉर्न, अज्ञात वाहनचालक, राजवाडा परिसराची मंडई करणारे भाजीवाले यांच्यावर कडक कारवाई व्हावी. सर्वसामान्य माणूस असंघटित असल्याने त्यांच्यावर हेल्मेटसक्ती लादणे पोलिस प्रशासनाला सोपे वाटत असावे. 
- विद्याधर आपटे, सातारा

ज्येष्ठांना हेल्मेटमुळे ऐकू येणार नाही
ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना शाळेमध्ये पोचविणे, आणणे यासारखी व इतर किरकोळ कामे ही करावीच लागतात. त्यामुळे स्त्रियांना हेल्मेट सांभाळणे अवघड होईल तसेच ज्येष्ठ नागरिकांना हेल्मेट डोक्‍यात घातल्यास आवाज ऐकू येणार नाही. तसेच समोरचे स्पष्ट दिसण्यास अडचण येवून अपघात होण्याची दाट शक्‍यता आहे. तरी शहरामध्ये दुचाकी चालविणाऱ्यांना हेल्मेटसक्‍ती नसावी.
- युवराज बर्गे,  शाहूनगर-गोडोली

शहरामध्येच होणार कारवाई 
हेल्मेट, सिट बेल्ट यांची आवश्‍यकता महामार्गावर, वेग जादा असणाऱ्या ठिकाणी जास्त आहे. मात्र, सिट बेल्ट जसे शहरात तपासतात तसेच हेलमेटसक्ती झाली की शहरामध्येच कारवाई होणार. शहरात गाड्यांचा वेग जास्त नसतो. त्यामुळे एकूणच काय तर, आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी... अशी या निर्णयाची अवस्था आहे.
-प्रशांत सुभाष जाधव, कऱ्हाड

हेल्मेटसक्ती कशासाठी?
कायम चारचाकी गाडीमधून फिरण्याची सवय लागलेल्या पोलिस महानिरीक्षकांना सर्वसामान्यांचे त्रास कसे कळणार ? गावातून वाहतुकीचे सर्व नियम मोडत गाड्या चालविणारी अल्पवयीन मुले आणि सुसाट तरुणाईला योग्य तो वचक बसविण्यासाठी पोलिस दलाचा वापर केला गेला तर तो अधिक उपयुक्त ठरेल. पोलिसांचे काम मिळेल त्या निमित्ताने जनतेकडून दंड वसुली करून महसुलात भर टाकणे हे नाही. मागेही हेल्मेटसक्तीचा प्रयोग शासनाने करून पाहिला आहे. पण, नागरिकांच्या विरोधामुळे तो प्रयत्न अडगळीत जावून पडला होता. 
- सुशांत बोरकर, सातारा

सोनू तुजा माझ्यावर 
‘विश्वास’ नाय का?
सातारचे खड्डे कसे, 
गोल गोल.. गोल गोल 
पथ दिवे लावताना झाले,  
झोल झोल ...झोल झोल
तरीपण हेल्मेट घालशील का,
बोल बोल...बोल बोल
बाकीच्या सुविधांचा 
उठलाय बोजवारा,
तरी दिला जातोय 
हेल्मेटसक्तीचा नारा।।
-एक वाचक, सातारा.

Web Title: satara news helmet compulsory oppose signature campaign