हायस्पीड ब्रॉडबॅंडने ६२६ ग्रामपंचायती कनेक्‍ट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

सातारा - देशातील एक लाखांहून अधिक ग्रामपंचायती ‘भारत नेट’च्या पहिल्या टप्प्यात हायस्पीड ब्रॉडबॅंडद्वारे जोडल्या गेल्या आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्याचा समावेश असून, जिल्ह्यातील ६२६ ग्रामपंचायती हायस्पीड ब्रॉडबॅंडने जोडल्या जाणार आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण जनता मागे राहू नये, यासाठी देशातील सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर्स नेटवर्कने ब्रॉडबॅंड इंटरनेट कनेक्‍शनद्वारे जोडण्याचा उपक्रम केंद्र सरकारने हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील २८ हजार ग्रामपंचायती हायटेक होणार आहेत.

सर्व ग्रामपंचायतींमध्ये ब्रॉडब्रॅंडची जोडणी झाल्यानंतर ग्रामपंचायतींचे कामकाज आणखी गतिमान, पारदर्शक व लोकाभिमुख होणार आहे. याखेरीज ग्रामपंचायतीचे बॅंक खाते उघडणे, पैसे भरणे, पैसे काढणे, डिमांड ड्राफ्ट, कर्जाचे वितरण, भारतीय आयुर्विमा महामंडळाचा विमा, आधारकार्ड, पॅनकार्ड काढणे, दप्तरी आर्थिक व्यवहार, विविध प्रकारचे १९ दाखले संगणकीकृत करणे शक्‍य होणार आहे. 

भविष्यात रेल्वे आरक्षण, थेट लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान तसेच विविध प्रशासकीय कामांची सुविधा ग्रामपंचायत प्रशासनाद्वारे गावातच उपलब्ध होणार आहे.

हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी भारत ब्रॉडब्रॅंड नेटवर्क लिमिटेड कंपनी कार्यान्वित करण्यात आली आहे. स्वतंत्रपणे काम करणारी ही कंपनी राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करण्यात आली आहे. योजना राबविण्याकरिता केंद्र सरकार, राज्य सरकार व भारत ब्रॉडबॅंड नेटवर्क लिमिटेड यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार झालेला आहे. त्यानुसार सर्व ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या जात आहेत.

जिल्ह्यातील एक हजार ४९४ पैकी सध्या ६२६ ग्रामपंचायतींत या जोडणींचे काम सुरू आहे. त्यामध्ये खंडाळा, कोरेगाव, खटावमधील ८६ ग्रामपंचायतींत ब्रॉडब्रॅंड जोडणी पूर्ण झाली असून, ५४० ग्रामपंचायतींत जोडणी सुरू आहेत. त्या पूर्ण झाल्यानंतर आपले सरकार, ग्रामपंचायतींचे काम अधिक गतीने सुरू होण्यास मदत होईल.

Web Title: satara news hispeed broadband 626 grampanchyat connect