साताऱ्यात वाढताहेत आलिशान गाड्यांचे शौकीन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

सातारा - बदलत्या काळात मध्यमवर्गीयांसाठी गरजेची बाब बनलेल्या मोटारी उच्च-मध्यमवर्गीयांसाठी मात्र चैनीचे रूप धारण करू लागल्या आहेत. इम्पोर्टेड व आलिशान गाड्यांच्या शौकिनांमध्ये साताऱ्यासारख्या जिल्ह्यातही वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात गेल्या अकरा महिन्यांत सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात १३ परदेशी बनावटीच्या महागड्या गाड्यांची नोंदणी झाली आहे. याखेरीज देशात विक्री होत असलेल्या; मात्र वीस लाखांपेक्षा जास्त किंमत असलेल्या १२६ वाहनांची नोंदणी झाली आहे.

मंदीच्या काळातही आलिशान व महागड्या वाहनांची खरेदी जिल्ह्यात कमी झालेली नाही. उलट आलिशान गाड्यांचे शौकीन वाढत असल्याचेच चित्र आहे. आतापर्यंत साताऱ्यात मर्सिडीज, ऑडी, इंडीव्हर फोर्च्युनर, इनोव्हा या गाड्या दिसत असत. उद्योजक, व्यावसायिक, राजकारण्यांकडे मोठ्या प्रमाणावर ही वाहने दिसायची. मात्र, आता त्या पुढे जाऊन परदेशी बनावटीच्या वाहनांनाही सातारकरांकडून पसंती दिली जात असल्याचे गेल्या वर्षभरात नोंदणी झालेल्या वाहनांवरून समोर येत आहे. सातारा उपप्रादेशिक परिवहन विभागात वर्षात नोंदणी झालेली बेंटली मोटर्स कंपनीची बेंटियागा २०१७ एमवाय या गाडीची विक्रीची किंमत चार कोटी दहा लाख सहा हजार रुपये आहे. त्या खालोखाल रेंज रोव्हर व्होग ही तीन कोटी ५३ लाख रुपयांची गाडी आहे. या बरोबरच पॉर्श एजी जर्मनीची मॅकेन २.०, कॅनी डिझेल, एसीए इंडिया ऑटोमोबाईलची लीव्हान्ट, व्होल्व्हो, जग्वार ॲण्ड लॅण्डरोव्हरची एफ पेस, स्पोर्ट, शेवरोलेट ट्रेलब्लेझर, लोंबागीनीची हुरिकन कूपे २ डब्ल्यूडी व डॅमलरच्या बी २०० डी या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांची किमत तीस लाखांपासून साडेतीन कोटी रुपयांपर्यंत आहे. परदेशी बनावटीच्या गाड्यांच्या शौकिनांनी या १३ गाड्यांपोटी उपप्रादेशिक परिवहन विभागात तब्बल एक कोटी ८९ लाख ६६ हजार ७९९ रुपयांचा कर भरला आहे.

परदेशी बनावटीच्या वाहनांबरोबरच देशी बनावटीच्या महागड्या गाड्यांचा वापरही जिल्ह्यात वाढत आहे. गेल्या अकरा महिन्यांत वीस लाख ते एक कोटी रुपये किमतीच्या १२६ वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये ऑडी, बीएमडब्ल्यू , मर्सिडीज, डॅमलर, फोर्ड इंडीव्हर, टोयाटो फॉर्च्युनर, कंपास, जग्वार, स्कोडा, व्होल्वो या कंपन्यांच्या वाहनांचा जास्त समावेश आहे. सर्वाधिक नोंदणी इनोव्हा क्रिस्टा या गाडीची झाली आहे.

महागड्या गाड्यांची नोंदणी
सात - एक कोटीपेक्षा जास्त किंमत असलेल्या गाड्या 
१२ - ५० लाख ते एक कोटी किंमत असलेल्या गाड्या        
११५-२० लाख ते ५० लाख रुपये किमतीच्या गाड्या

Web Title: satara news imported vehicle in satara