निसर्गप्रेमींना खुणावू लागली रानफुले! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

उंडाळे - कऱ्हाड दक्षिणच्या डोंगरदऱ्यातील रानफुलांचे वेल, झुडपे फुलांनी बहरू लागल्याने रानफुले निसर्गप्रेमींना खुणावू लागली आहेत. त्यात लाल व पांढरा जास्वंद आपले अस्तित्व अधिकच अधोरेखित करत आहेत. भारंगी, कुडकुडी, घाणेरी, जाई, जुई, मोगरा, धोतरा, रुई आदी रानफुले चांगलीच बहरली आहेत. 

प्रतिवर्षी पावसाळ्यात परिसरातील डोंगरदऱ्यांत असणारी झाडेझुडपे फुलण्यास प्रारंभ होतो. इतरवेळी सहसा दुर्लक्षित राहिलेली ही झुडपे, वेली पावसाळ्याच्या सुरवातीला मात्र रंगीबेरंगी फुलांनी बहरल्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. यंदा पावसाळ्याचे प्रमाण कमी आहे. मात्र, अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या हलक्‍या सरी, सतत अधूनमधून पडणारे ऊन असे ऊन-पावसाचे पोषक वातावरण मिळाल्याने इतरवेळी कायम दुर्लक्षित राहणाऱ्या झुडपे, वेलींना रंगीबेरंगी फुले फुलली आहेत. त्यात लाल जास्वंद, पांढरा जास्वंद आपले अस्तित्व अधोरेखित करत आहेत. भारंगी, कुडकुडी, घाणेरी, जाई, जुई, मोगरा, धोतरा, रुई आदी रानफुले बहरली आहेत. ढगाळ वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर फुलवेली, झुडपे निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत. डोंगरावर माळरानावर मंद वाऱ्याच्या झुळकीने फुले डोलताना मनाला वेगळाच आनंद देत आहेत. अनेक निसर्गप्रेमी हा आनंद लुटण्यासाठी माळरानाची भटंकती करताना दिसत आहेत. अनेक हौशी छायाचित्रकार कॅमेऱ्यासह डोंगरदऱ्या पालथ्या घालून निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली फुलांची उधळण कॅमेराबद्ध करत आहेत.

Web Title: satara news karad flower Nature