कऱ्हाडमध्ये विद्यार्थिनीचा पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

सचिन शिंदे
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

नदी काठावर मासेमारी करणाऱ्या काही लोकांच्या युवती बुडत असलाचे लक्षात आले. त्यांनी त्वरीत तिला बाहेर काढली.

कऱ्हाड : येथील शासकीय डिप्लोमा महाविद्यालयातील युवतीने येथील नवीन कृष्णा पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तेथे मासेमारीसाठी असलेल्या काही लोकांनी तिला वाचवले. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास घटना घडली. प्राण वाचवलेली मुलगी कडेगाव तालुक्यातील आहे. ती शिक्षणासाठी येते असते. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. तीच्या नातेवाईकांना बोलावून तिला ताब्यात देण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. 

पोलिस व घटनास्थळावरील माहिती अशी : येथील नविन कृष्णा पुलावरून युवती निघाली होती. तिच्या पाठीवर सॅगही होती. ती पुलावर जरा अंतर आली. तिने सॅक काढून खाली ठेवली. ती मोबाईलवर बोलत होती. त्यावेळी ती अचानक पुलाच्या रॅकवर चढली. तिथून जाणाऱ्या काॅलेज युवकांनी तिला हटकले. त्यावेळी ती खाली उतरली. काय करतेस म्हणत त्या मुलांनी तिचे ओळखपत्र बघितले. त्याचवेळी त्या मुलीने त्यांना हिसका मारून तेथून पळली. ती थेट रॅकवर चढली व पाण्यात उडी मारली. ‌युवकांदेखत घडलेल्या घटनेने खळबळ उडाली. त्यांनी आरडाओरडा केला.

त्यावेळी नदी काठावर मासेमारी करणाऱ्या काही लोकांच्या युवती बुडत असलाचे लक्षात आले. त्यांनी त्वरीत तिला बाहेर काढली. तिला पुलाशेजारील घरात नेण्यात आले. तेथे जमले होते. काही लोकानी तिच्याकडे विचारपूस केली. त्यावेळी त्या मुलीने उलटा दंगा सुरू केला. त्यावेळी तेथे पोलिसांना बोलवण्यात आले. घटनास्थळी पोलिस निरिक्षक राजकुमार राजमाने, सहायक फौजदार शिंदे, हवालदार पाटील व निर्भया पथकाच्या हवालदार रेखा देशपांडे घटनास्थळी आले. त्या मुलीकडे विचारपूस करून तिला पोलिस ठाण्यात नेण्यात आले. आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केली, याची विचारपूस पोलिस करत होते. मात्र त्याचे कारण समजू शकले नाही. ती मुलगी मूळच रायबाग (ता. कडेगाव) असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याबाबत तिच्या नातेवाईकांना बोलावण्यात आले असून, तिला पूर्ण चौकशी करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार  आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: satara news karad girls attempts to commit suicide