वीजेचा धक्का बसून शिवप्रतिष्ठानच्या दोघांचा मृत्यू

वीजेचा धक्का बसून शिवप्रतिष्ठानच्या दोघांचा मृत्यू
वीजेचा धक्का बसून शिवप्रतिष्ठानच्या दोघांचा मृत्यू

कऱ्हाड (सातारा): सैदापूर येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी ध्वज लावण्यासाठीची लोखंडी पाईप उभी करताना त्या पाईपला वीज वाहक तारांना स्पर्श झाला. त्यातून प्रवाहीत झालेल्या वीजेचा धक्का बसल्यानेच शिवप्रतिष्ठानच्या येथील दोघांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. काल सायंकाळी सातच्या सुमारास घटना घडली. रात्री उशिरा त्यांची नोद पोलिसात झाली आहे. ओमकार उत्तमराव माने (वय ३०, रा. शुक्रवार पेठ) व आकाश मोहन ढवळे (२५, रा. बुधवार पेठ) अशी युवकांची नावे आहेत. दोघेही शिवप्रतिष्ठानचे येथील सक्रीय कार्यकर्ते आहेत. आज सकाळी लवकर अत्यंत शोकाकूल वातावरणात दोन्ही युवकांवर येथील वैकुंठ स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघांच्या मृत्यूबद्दल हळहल व्यक्त होत होती.

पोलिसांची माहिती अशी ः सैदापूर येथे कार्यक्रम होणार होता. त्याच्या तयारीसाठी ओमकार व आकाश तेथे गेलो होते. त्या कार्यक्रमासाठी ध्वज लावण्याचे काम त्यांच्याकडे होते. त्यांनी ध्वज लावण्यासाठी त्यांनी लोखंडी मोठी पाईप आणली होती. त्यापूर्वी त्यांनी जमीनीत पाच फुटी पाईप रोवली होती. त्यावर अठरा फुटी पाईप ते रोवणार होते. ती लावत असताना त्या पाईपचा बॅलन्स गेला. ती डावीकडे कलली अन् ती पाईप वरून वीज वाहून नेणाऱ्या तारेला थटली. त्यामुळे त्याचा वीजप्रवाह त्या लोखडी पाईपमधून पास जाला. त्याचा जोरात शॉक ओमकार व आकाश यांना लागला. शॉक इतक्या जोराचा होता की, ते जागीच ठार झाले. त्यामध्ये अन्य एकजण किरकोळ जखमी आहे. त्याला फारसे लागलेले नाही. उपचारानंतर त्यास घरी सोडण्यात आले. तेथे उपस्थीत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना त्वरीत कृष्णा रूग्णालयात हलवले. मात्र त्यांना दाखल करून घेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषीत केले. पाईप ज्या दिशेला कलली तेथे वीजेच्या तारा होत्या. मात्र अंधारामुळे त्या तारांचा दोघांना अंदाज आला नाही. त्यामुळे दुर्घटना घडली.

शॉक सर्कीटने दोघांचा मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली होती. त्यांच्या मृत्यूबाबत शहरात हलहळ व्यक्त होत होती. ओमकार व आकाश दोघेही सामान्य कुटूंबातील आहेत. ओमकार येथील शुक्रवार पेठेत राहतो. ओमकारचा मित्र परिवार मोठा आहे. तो स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करायचा. घरची शेतीही बघत होता. त्याच्या जाण्याचा मोठा आघात त्याच्या कुटूंबावर झाला आहे. त्याच्या मागे आई, वडील व तीन बहिणी आहेत. आकाशही सामान्य कुटूंबातील आहे. गल्लीत तो सागर या टोपण नावेन परिचीत होता. त्याच्या मागे आई, वडील व एक भाऊ आहे. तो खासगी ठिकाणी नोकरी करत होता. त्याशिवाय लग्न किंवा अन्य समारंभात सजावटीचे काम तो करायचा. त्यामुळे त्याचाही मित्र परिवरा चांगाल होता. दोघेही शिवप्रतिष्ठानचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. त्यांना काल रात्री कृष्णा रूग्णालयात नेले होते. त्यावेळी तेथे शिव प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. काय झाले आहे, तेच कळत नसल्याने ती जाणून घेण्याची उत्सकता कार्यकर्त्यात होती. मोठ्या प्रमाणात आलेले कार्यकर्ते लक्षात घेवून विठ्ठल रूक्ममी मंदीर ट्रस्टचे अद्यक्ष अतुल भोसले रूग्णालयात आले होते. त्यांनी कार्यकर्त्यांना समाजवून सांगितले. रात्री उशिराय येथील उपजिल्हा रूग्णालयात त्या दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले. त्यानंतर पहाटे त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सकाळी लवकर काही मिनीटांच्या फरकाने दोघांवर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद काल रात्री उशिरा शहर पोलिसात झाली आहे. हवालदार साबले तपास करत आहेत.

सोशल मिडीयावरही श्रद्धांजली...
ओमकार व आकाश यांचा मित्र परिवरा मोटा आहे. सिवाय ते शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते होते. त्यामुळे काल रात्रीपासूनच त्यांच्या छायाचित्रासह त्यांना सोशल मिडीवर श्रद्धांजली वाहण्यात येत होती. अनेकांनी त्यांचे छायाचित्र टाकून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे सोशल मिडीवारही त्यांच्या बाबातच्या दुःखत घटनेची नोंद घेतल्याचे दिसले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com