निसर्गरम्य कासमध्ये पाल्यांवर श्रमसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

सातारा - मुलांवर श्रमसंस्कार व्हावेत, निसर्गात जाताना जबाबदार पर्यटन कसे असावे, याचा परिपाठ आज सजग पेरेन्ट्‌स ग्रुपने आपल्या पाल्यांना घालून दिला. या ग्रुपसह धनंजय जांभळे मित्रसमूह व नागरिकांनी सुमारे ३० पोती प्लॅस्टिक कचरा वेचला. 

‘सकाळ’च्या पुढाकाराने लोकसहभागातून सुरू झालेल्या कास स्वच्छता मोहिमेत आज सुमारे ६० नागरिकांनी भाग घेतला. 

साताऱ्यातील सजग पेरेन्ट्‌स ग्रुप हा एक जागृत पालकांचा ग्रुप आहे. मुलांचे बालपण जपण्याची भाषा नुसती व्यक्त न करता  विविध उपक्रमांतून हे नागरिक आपल्या पाल्यांचे बालपण जपत उद्याचे जबाबदार नागरिक घडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. मुलांवर श्रमसंस्कार व्हावेत. निसर्गात जाताना त्यांना जबाबदार वर्तनाची जाणीव असावी, या उद्देशाने आज या ग्रुपच्या सदस्यांनी सहकुटुंब श्रमदानात भाग घेतला. 

भाजपचे पालिकेतील गटनेते, नगरसेवक धनंजय जांभळे, नगरसेवक ॲड. सुहास खामकर व धनंजयभाऊ जांभळे मित्रसमूहाच्या २५ कार्यकर्त्यांनी श्रमदानात योगदान देत कास तलाव परिसराची स्वच्छता केली.

पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते कन्हैयालाल राजपुरोहित, पंकज नागोरी, निखिल वाघ, सुधीर चव्हाण, रवींद्र सासवडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमदान झाले.

आजवर ४०० पोती प्लॅस्टिक कचरा जमा
ता. २१ जानेवारी रोजी कास स्वच्छता मोहिमेस सुरवात झाली. गेल्या तीन आठवड्यांत सुमारे ४०० पोती प्लॅस्टिक कचरा कास तलाव परिसरातून वेचला गेला. अजूनही पाण्याखाली बराच प्लॅस्टिक कचरा दडला आहे. उन्हाळ्यात पाणीपातळी खालावेल तसा हा कचरा उघडा पडत जाणार आहे. त्यामुळे ही मोहीम दर रविवारी मजलदरमजल करत मे महिन्यापर्यंत चालणार आहे. येत्या पर्यटन हंगामापर्यंत कासमध्ये ठोस व शाश्वत काम उभे राहील, अशी अपेक्षा आहे. या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी मोहिमेचे समन्वयक शैलेन्द्र पाटील, ९८८११३३०८५ यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: satara news kas cleaning tourism