कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती

सचिन शिंदे
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

सलग तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली आहे. पाणीसाठा नियंत्रणात आल्याने सहा वक्र दरवाजे बंद केले आहेत. पावसाने पुर्ण विश्रांती घेतल्याने पाण्याची आवक कमी झाली आहे. पायथा वीजगृहातुन करण्यात येणारा दोन हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग बंद केला आहे.

कऱ्हाड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा व महाबळेश्वर येथे पावसाने विश्रांती घेतली आहे.

पाणीसाठा पुर्ण नियंत्रणात आल्याने धरणाचे सहा वक्र दरवाजे बंद केले. पायथा वीजगृहातुन होणारा विसर्गही बंद केला आहे. पाऊस थांबल्याने धरणातील पाणीसाठा स्थिर आहे.

सलग तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली आहे. पाणीसाठा नियंत्रणात आल्याने सहा वक्र दरवाजे बंद केले आहेत. पावसाने पुर्ण विश्रांती घेतल्याने पाण्याची आवक कमी झाली आहे. पायथा वीजगृहातुन करण्यात येणारा दोन हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग बंद केला आहे. कोयना धरणाची पाणीपातळी २१६३.१ फुट आहे. पाणीसाठा १०४.७० टीएमसी आहे. धरणात प्रतिसेकंद सात हजार ३५ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

Web Title: Satara news Koyna Dam rainfall