कोयना धरणातून होत असलेल्या विसर्गात कपात

सचिन शिंदे
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

पायथा वीजगृह व सहा वक्र दरवाजातुन सात हजार ९७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीत होत आहे. पायथा वीज गृहातुन दोन हजार १६६ व सहा वक्र दरवाजातुन चार हजार ९३१ क्युसेक असा सात हजार ९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत होत आहे.

कऱ्हाड : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाने विश्रांती घेतल्याने दोन फुटाने उचलेले धरणाचे दरवाजे एक फुटावर आणले, अशी माहिती धरण व्यवस्थापनाने दिली.

पायथा वीजगृह व सहा वक्र दरवाजातुन सात हजार ९७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीत होत आहे. पायथा वीज गृहातुन दोन हजार १६६ व सहा वक्र दरवाजातुन चार हजार ९३१ क्युसेक असा सात हजार ९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीत होत आहे. चोवीस तासात  कोयनानगरला १२ (३२७५), नवजाला २९ (३६२१) व महाबळेश्र्वरला ३३ (३०९८) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कोयना धरणाची एकुण पाणीपातळी २१४५ फुट झाली आहे. धरणात ८३.४३ टीएमसी पाणी साठा झाला आहे.  कोयना जलाशयात प्रतिसेकंद १५ हजार ४९७ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.

Web Title: Satara news Koyna Dam water released