माझा सातारा माझी मॅरेथॉन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

सातारा - छत्रपतींच्या राजधानी परिसरातील डोंगरदऱ्यांत आज पुन्हा "जय भवानी, जय शिवाजी, हरहर महादेव'चा नारा घुमला. अंगात बारा बंदी, कमरेला शेला आणि डोक्‍यावर मराठी शाहीची पगडी अशा वेषातील काही धावपटूंनी सहभागी होत पीएनएबी मेटलाइफ सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला खरेखुरे शाही रूप दिले. आज प्रत्येक सातारकराने धावपटूंना प्रोत्साहित करून "माझा सातारा, माझी मॅरेथॉन' हे ब्रीदवाक्‍य अधोरेखित केले. 

मॅरेथॉन असोसिएशन साताऱ्याने आयोजिलेल्या या स्पर्धेस पोलिस कवायत मैदानावरून सकाळी सहा वाजता प्रारंभ झाला. अवघ्या काही मिनिटांत परदेशी धावपटूंनी सुमारे दोन ते तीन किलोमीटरचे अंतर पार करून समर्थ मंदिर, बोगद्यानजीकचा यवतेश्‍वरचा घाट चढला. त्यांच्या पाठोपाठ एकेक धावपटू यवतेश्‍वर घाटात पोचले. प्रकृती रिसॉर्टच्या पुढे 500 मीटर अंतरास वळसा मारून धावपटू पुन्हा पोलिस कवायत मैदानाकडे कूच करीत होते. हिरव्यागार डोंगरात हजारो धावपटू भगव्या टी-शर्टमध्ये धावताना "जय भवानी, जय शिवाजी, भारतमाता की जय' अशा घोषणा देत होते. स्पर्धा मार्गावर सातारकर नागरिक धावपटूंना टाळ्या-शिट्यांनी प्रोत्साहित करीत होते. चौकाचौकांमध्ये धावपटूंसाठी पिण्याच्या पाण्याची तसेच शक्तिवर्धक पेयांची व्यवस्था करण्यात आली होती. राजमाची येथील धर्मवीर संभाजीराजे जिमखानाच्या व्यासपीठावर अभिनेते सयाजी शिंदे यांनी उपस्थिती लावून धावपटूंचा उत्साह वाढविला. अदालत राजवाड्यासमोर श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट आणि गुरुकुल स्कूलने देशभक्तिपर गाण्यांवर नृत्य सादर करून धावपटूंना प्रोत्साहन दिले. त्यापुढे ढोल-ताशांच्या गजरात धावपटूंचे स्वागत केले जात होते. आनंद परिवार चॅरिटेबल ट्रस्टद्वारे धावपटूंसाठी पाण्याची तसेच शक्तिवर्धक पेयाची व्यवस्था करण्यात आली होती. एकेक धावपटू पुन्हा पोलिस कवायत मैदानावर पोचत असताना त्यांचे "कमॉन कमॉन, यु डीड ईट' असे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले जात होते. मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज, मावळ्यांच्या वेशभूषेत असलेल्या सातारकरांसमवेत अनेक धावपटू सेल्फी काढत होते. 

"राजधानी रन' छोट्या धावपटूंचा सहभाग 

मुख्य स्पर्धेदरम्यान "राजधानी रन'चे ही आयोजन केले होते. यामध्ये छोट्या धावपटूंसोबत पालक, शिक्षक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

Web Title: satara news marathon