विद्यार्थ्यांचा विज्ञान, कला शाखेकडे ओढा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

सातारा - जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांत आजपासून अकरावी प्रवेशाच्या अर्ज विक्रीस प्रारंभ झाला. बहुतांश तालुक्‍यांमध्ये विद्यार्थ्यांचा ओढा विज्ञान शाखेबरोबरच कला शाखेकडे असल्याचे चित्र होते. 

सातारा - जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांत आजपासून अकरावी प्रवेशाच्या अर्ज विक्रीस प्रारंभ झाला. बहुतांश तालुक्‍यांमध्ये विद्यार्थ्यांचा ओढा विज्ञान शाखेबरोबरच कला शाखेकडे असल्याचे चित्र होते. 

दहावीच्या परीक्षेत यंदा 40 हजार 241 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्यामध्ये 12 हजार 534 विद्यार्थी विशेष श्रेणीत, 14 हजार 238 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, दहा हजार 801 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तसेच दोन हजार 668 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने केलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावी प्रवेशासाठी आजपासून प्रवेश अर्ज विक्रीस प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख महाविद्यालयांनी मुला-मुलींसाठी वेगळ्या रांगा लावून अर्ज विक्री केली. प्रवेश अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया 28 जूनपर्यंत सुरू राहील. त्यानंतर तीन जुलैला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, 16 जुलैला अकरावीचे वर्ग सुरू होणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांनी अर्जाचे शुल्क दहा रुपये, तर माहिती पत्रकाचे शुल्क जास्तीत जास्त 40 रुपये घ्यावेत, असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. 

अकरावी प्रवेशाची जिल्ह्याची स्थिती 
कला-13 हजार 940 
वाणिज्य- सहा हजार 980 
विज्ञान- 14 हजार 320 
कला- वाणिज्य संयुक्त- तीन हजार 280 

Web Title: satara news Mission Admissions

टॅग्स