खून करणारा पती गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

सातारा - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या भारत कमलाकर जाधव (वय 29) यास शाहूपुरी पोलिसांनी काल रात्री अटक केली. न्यायालयाने आज त्याची तीन दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली. 

सातारा - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या भारत कमलाकर जाधव (वय 29) यास शाहूपुरी पोलिसांनी काल रात्री अटक केली. न्यायालयाने आज त्याची तीन दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली. 

गडकरआळी येथे  शनिवारी  सायंकाळी पत्नीचा कोयत्याने खून करून पळून गेलेल्या भारत जाधवच्या मागावर पोलिस होते. काल रात्री पिलेश्वरीनगरपर्यंत पोलिसांनी त्याचा माग काढला. सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास कॅनॉलजवळ बसलेल्या अवस्थेत पोलिसांनी त्याला पकडले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे लैलेश फडतरे, अमित माने यांनी ही कारवाई केली. चारित्र्याच्या संशयावरून जाधवने पत्नीचा खून केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. त्याच्या चौकशीत या खून प्रकरणावर अधिक प्रकाश पडेल, असे पोलिसांनी सांगितले. शाहूपुरीचे निरीक्षक किशोर धुमाळ तपास करत आहेत.

Web Title: satara news murder crime

टॅग्स