कऱ्हाड : मुस्लिम बांधवांकडून गणेशाची आरती 

हेमंत पवार
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अजुनही हिंदु-मुस्लिम समाजात एेक्य कायम आहे. ते यापुढेही कायम रहावे यासाठी सर्वानी प्रयत्न करावे. कऱ्हाड तालुका पोलिस निरीक्षक श्री. क्षिरसागर यांनी जिल्ह्यात पहिल्यांदाच संगम गणेश मंडळाने कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत हिंदु-मुस्लीम एेक्यासाठी राबवण्यात आलेला उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करुन मंडळाच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

कऱ्हाड : लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक एकामत्मतेची, देशभक्तीची भावना वाढीस लागुन त्यामाध्यमातुन सर्वांना एकत्र येण्याचे व्यासपिठ मिळावे. यासाठी गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. त्यातुन आज सर्वत्र गणेशोत्सव विविध उपक्रमांव्दारे साजरा होत आहे. लोकमान्य टिळकांच्या विविध धर्माच्या एकात्मतेच्या संदेशाचे पालन करत तांबवे (ता.कऱ्हाड) येथील संगण गणेश मंडळाच्यावतीने बकरी ईदच्या पार्श्वभुमीवर मुस्लिम समाजाच्यावतीने गणेशमुर्तीची आरती करुन जिल्ह्यातील मंडळांना सामाजिक एकतेचा संदेश दिला.

तांबवे येथील संगम गणेश मंडळाच्यावतीने मुस्लीम बांधवाच्यावतीने आयोजित आरतीसाठी पोलिस उपाधिक्षक नवनाथ ढवळे, कऱ्हाड तालुका पोलिस निरीक्षक अशोकराव क्षिरसागर, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, सरपंच संतोष कुंभार, उपसरपंच रविंद्र ताटे, खानसाब संदे, वजीर संदे, इनायतुल्ला मुल्ला, नजीर संदे, वल्लीसाब संदे, राजु संदे, चाॅद शेख, लाडसाब नदाफ, मौला पटेल, जमीर मुल्ला, मुराद मुल्ला, मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील, उपाध्यक्ष विजयसिंह पाटील, सचिव हेमंत पवार, खजिनदार अरुण ताटे, विशाल पाटील, सौरभ देसाई, जयदीप पाटील, नितीन पवार, सूरज पाटील यांच्यासह हिंदु-मुस्लिम बांधव उपस्थित होते. उपाधिक्षक ढवळे म्हणाले, सातारा जिल्ह्यात पहिल्यांदाच अशाप्रकारचा उपक्रम राबवण्यात आला. संगण गणेश मंडळाने लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेतील गणेशोत्सव कृतीतुन साध्य करुन दाखवला आहे. त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी उचलेले पाऊल जिल्ह्यातील मंडळांसाठी प्रेरणादायी असुन अशा उपक्रमांची सध्या समाजात गरज आहे. त्यासाठी जिल्ह्यातील गणेश मंडळांनी पुढाकार घ्यावा.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अजुनही हिंदु-मुस्लिम समाजात एेक्य कायम आहे. ते यापुढेही कायम रहावे यासाठी सर्वानी प्रयत्न करावे. कऱ्हाड तालुका पोलिस निरीक्षक श्री. क्षिरसागर यांनी जिल्ह्यात पहिल्यांदाच संगम गणेश मंडळाने कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत हिंदु-मुस्लिम एेक्यासाठी राबवण्यात आलेला उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करुन मंडळाच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, उपसरपंच रविंद्र ताटे यांनी संगम मंडळाने समाजीक बांधीलकीतुन अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवुन गावच्या विकासाठी हातभार लावला असुन सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यासाठी राबवलेला उपक्रम अन्य मंडळांनीही राबवावा असे आवाहन केले. 

Web Title: Satara news muslims people in karhad