भारतीय संघाला चित्ररूपी शुभेच्छा...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

सातारा - लुसलुशीत हिरवळीवरच्या मैदानावर फुटबॉल खेळणारा खेळाडू, ‘किक’ने निळ्या आकाशात उंच उडालेला चेंडू, खेळाने हालचालीवरून दिसणारी तंदुरुस्ती अशी थेट मैदानावर, गॅलरीत बसून आपल्या कल्पनेतून उत्कृष्ट चित्रे रेखाटून सुमारे दोन हजार ८०० विद्यार्थ्यांनी जागतिक फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १७ वर्षांखालील मुलांच्या भारतीय संघास शुभेच्छा दिल्या.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि सकाळ माध्यम समूहाच्या ‘एनआयई’च्या संयुक्त विद्यमाने येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियन चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या माध्यमातून देशात होणाऱ्या जागतिक फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १७ वर्षांखालील मुलांच्या भारतीय संघास विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रांतून शुभेच्छा द्याव्यात हा उद्देश होता. स्पर्धेच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमास लायन्स क्‍लब ऑफ एमआयडीसीचे अध्यक्ष कीर्ती तोडकर, रोटरी क्‍लबचे अध्यक्ष अमित कदम, सातारा जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष सुरेश साधले, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, पुणे विभाग माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेचे अध्यक्ष यशवंत गायकवाड, जिल्हा क्रीडाधिकारी सुहास पाटील, क्रीडाधिकारी सुनील धारुरकर, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक 

श्रीकांत कात्रे, शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर, उद्योजक राजेंद्र मोहिते, ‘एनआयई’चे समन्वयक विजय सुतार आदी  उपस्थित होते. 

यावेळी श्री. कात्रे, श्री. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सुहास पाटील यांनी प्रास्ताविक केले. स्नेहल पाटील यांनी आभार मानले. विविध गटांत झालेल्या या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी शहरातील कला-क्रीडा शिक्षकांनी परिश्रम घेतले. 

Web Title: satara news nie drawing