ऑनलाइन सातबारा दुरुस्तीसाठी ‘ऑफलाइन’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

सातारा - सातबारा संगणकीकृत झाले, आता ते ऑनलाइन उपलब्ध करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. ऑनलाइन झालेल्या सातबारांतील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी तपासणी सुरू आहे. त्यामुळे हे ऑनलाइन सातबारा ऑफलाइन झाल्यासारखी स्थिती आहे. आतापर्यंत केवळ ४० टक्के सातबारा ऑनलाइन झाले आहेत. उर्वरित ६० टक्के काम येत्या जूनपर्यंत पूर्ण करण्याचे महसूल प्रशासनाचे नियोजन आहे. त्यासाठी गावकामगार तलाठ्यांची मदत घेतली जात आहे. जिल्ह्यात पाटण, माण, खटाव हे तीन तालुके अद्याप मागे असल्याचे दिसते.

जमिनीचे सातबारा शेतकऱ्यांना ऑनलाइन उपलब्ध करण्यासाठी सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात युद्धपातळीवर काम सुरू आहे. ऑनलाइन झालेल्या सातबाऱ्यांमध्ये चुकी अथवा त्रुटी राहू नयेत, यासाठी तपासणी केली जात आहे. त्यासाठी तलाठ्यांची मदत घेतली जात आहे. एकदा जिल्ह्यातील प्रत्येक गावाचे सातबारा ऑनलाइन झाले की, शेतकरी आपला सातबारा कुठेही ऑनलाइन पाहू शकणार आहे. सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी सर्वच गावांचे सातबारा ऑनलाइन दिसत नाहीत.

अजूनही काही गावांत तलाठ्यांकडूनच लेखी स्वरूपात सातबारा घ्यावे लागत आहेत. ऑनलाइन आणि ऑफलाइन सातबाऱ्यांमध्ये कोणतीही तफावत राहू नये, यासाठी सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात काम केले जात आहे. आतापर्यंत ४० टक्के सातबारा ऑनलाइन झाले आहेत. उर्वरित ६० टक्के सातबारा ऑनलाइनमध्ये भरण्याचे काम बाकी आहे. जे सातबारा ऑनलाइन झाले आहेत, त्यांची तपासणी सुरू आहे. ही तपासणी जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असून त्यासाठी तलाठ्यांची मदत घेतली जात आहे. 
सातबारा ऑनलाइन नसल्याने दस्तनोंदणी कार्यालयात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारावेळी अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.

आठ तालुके प्रगतिपथावर, तीन मागे
आतापर्यंत पाटण, माण, खटाव या तीन तालुक्‍यांत इंटरनेटचे स्पीड कमी असल्याने तेथील सातबारा ऑनलाइन होण्याचे काम मागे राहिले आहे. सातारा तालुक्‍याचेही काम मागेच आहे. सध्या तरी हे तीन तालुके वगळून उर्वरित आठ तालुक्‍यांतील सातबारा जूनपर्यंत ऑनलाइन पाहायला मिळतील, असे महसूल प्रशासनाचे नियोजन आहे. 

आकडे बोलतात....
जिल्ह्यातील एकूण गावे :     १७१५
सातबारा ऑनलाइन झालेली गावे :     ७५३
सातबारा ऑनलाइन नसलेली गावे :     ९६२

Web Title: satara news online satbara repairing offline