कऱ्हाड: पालकांनी मुख्याध्यापक कार्यालयाला ठोकले टाळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

नेहमी प्रमाणे सकाळ सत्राची शाळा भरलेली होती. काही मुले सेवा रस्त्यावर खेळत असलेली पालकांच्या निदर्शनास आले.त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे पालक ग्रामपंचायत सदस्यांनी जावून पाहिले त्यावेळी वर्गात शिक्षक नव्हते. काही वर्गावर चौथीच्या वर्गातील मुले खालच्या वर्गावर शिकवत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सर्व जमा झालेले पालक मुख्याध्यापकांना भेटण्यास गेले.

कऱ्हाड : उंब्रज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत आहे, त्यातच शिक्षकांच्या मनमानी कारभार होत आहे, त्याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याचा आरोप करत संतापलेल्या पालकांनी मुख्याध्यापक कार्यालयाला टाळे ठोकले.

यावेळी केंद्र प्रमुख व मुख्याध्यापकांना चांगलेच धारेवर धरले. यानंतर शालेय समिती व्यवस्थापन व संतापलेल्या पालकांमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चे नंतर यावर पडदा पडला. उंब्रज येथील प्राथमिक जिल्हा परिषद शाळेची इमारती अभावी गेले वर्षे भरापासून परवड सुरू आहे. यामध्ये ही शाळा दोन सत्रात गेले वर्षे भरापासून सुरू आहे. तर सकाळी भरणाऱ्या सत्रातील १२ ते १३ तुकड्यासाठी १४ शिक्षक मंजुर असून प्रत्यक्षात १२ शिक्षक कार्यरत आहेत. मात्र गत महिन्यात ४ शिक्षकांची बदली झाली असून २ शिक्षक अद्याप हजर नसल्याने ८ शिक्षकांवर शेकडो विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम सुरू आहे. यामध्ये बघ हजर शिक्षकांपैकी काही शिक्षक आपल्या कामाच्या वेळेत शाळेत नसल्याने पालकांनी संताप व्यक्त केला. शाळेत वेळेत हजर नसलेल्या मात्र उघडलेल्या मुख्याध्यापक कार्यालयाला कुलूप ठोकले. यानंतर अर्धातासाने आलेले केंद्रप्रमुख आनंदा शिंदे व मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी संतापलेल्या पालकांशी हुज्जत घालत दादागिरीची भाषा वापरल्याने पालकांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

नेहमी प्रमाणे सकाळ सत्राची शाळा भरलेली होती. काही मुले सेवा रस्त्यावर खेळत असलेली पालकांच्या निदर्शनास आले.त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे पालक ग्रामपंचायत सदस्यांनी जावून पाहिले त्यावेळी वर्गात शिक्षक नव्हते. काही वर्गावर चौथीच्या वर्गातील मुले खालच्या वर्गावर शिकवत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सर्व जमा झालेले पालक मुख्याध्यापकांना भेटण्यास गेले. तेव्हा मुख्याध्यापक अशोक पाटीलही कार्यालयात नव्हते. त्यामुळे संतप्त पालकांनी मुख्याध्यापक कार्यालयाला कुलूप ठोकले. त्याची माहिती शिक्षकांना समजल्यानंतर केंद्रप्रमुख आनंदा शिंदे व मुख्याध्यापक अशोक पाटील अर्ध्या तासाने शाळेत आले. त्यावेळी पालक व शिक्षक यांच्यात जोरदार तू तू मै मै झाले. यानंतर शिक्षक व्यवस्थापन समितीने ग्रामस्थ, पालक व शिक्षक यांच्यातील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर कार्यालयाला लावलेले कुलूप काढण्यात आले.

Web Title: Satara news parents agitation against school in umbraj