सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

पोवई नाक्‍यावरील ‘प्रेस्टीज’च्या बेसमेंटमधील पाणी मोटारीने सोडले जाते रस्त्यावर

सातारा - पोवई नाक्‍यावरील ‘प्रेस्टीज चेंबर्स’ या इमारतीच्या बेसमेंटमध्ये साचणारे पाणी तसेच निर्माण होणारे सांडपाणी मोटारीने उपसून रोजच्या रोज रस्त्यावर सोडण्यात येते. या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून, डांबरी रस्त्याचेही नुकसान होत आहे. या इमारतीचा प्लॅन मंजूर करताना पालिकेने नेमक्‍या कोणत्या गोष्टींची तपासणी केली होती, असा प्रश्‍न नागरिकांतून उपस्थित होत आहे.

इमारतीमधील त्रुटीप्रकरणी पालिकेने संबंधितावर कारवाई करावी व रस्त्यावर सांडपाणी सोडण्याच्या बेफिकीर प्रवृत्तीला लगाम घालावा, अशी अपेक्षा आहे. 

पोवई नाक्‍यावर, मरिआई कॉम्प्लेक्‍समागे ‘प्रेस्टीज चेंबर्स’ही इमारत आहे. या इमारतीच्या बेसमेंटची उंची जमिनीच्या उंचीपेक्षा अधिक खोल आहे. या बेसमेंटमध्ये पावसाचे पाणी साचते. त्याचबरोबर सांडपाणीही साचते. त्याचा उपद्रव बेसमेंटमधील गाळेधारकांना होतो. त्याला पर्याय म्हणून बेसमेंटमध्ये साचणारे पाणी मोटारीने उचलून रस्त्यावर सोडून देण्याची युक्ती अवलंबण्यात आली आहे. प्रचंड दुर्गंधी येणारे हे सांडपाणी इमारतीच्या दारातील रस्त्यावर सोडून देण्यात आल्याने ते उतारावरून वाहत मरिआई कॉम्प्लेक्‍सला वळसा मारून शिवाजी सर्कलपर्यंत जाते. पादचारी, वाहनचालकांना याच पाण्यातून प्रवास करावा लागतो. वारंवार विशिष्ट जागेवरून पाणी वाहिल्याने डांबरी सडकेवर परिणाम होत असून, त्याठिकाणी डांबर उचकटून चर पडण्याची शक्‍यता आहे. पालिकेने अनेकदा संबंधितांना नोटिसा दिल्या आहेत. मात्र, तरीही इमारतीच्या बेसमेंटमध्ये साचणारे पाणी रस्त्यावर सोडून दिले जाते. बेसमेंटमध्ये साचणाऱ्या या पाण्यात डांस अंडी घालतात.

पालिकेने तातडीने कारवाई करावी 
दरम्यान, या परिसरात खाद्यपदार्थांची दुकाने व स्टॉल आहेत. उघड्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांच्या व्यवसायावरही परिणाम होऊ शकतो. पालिकेने तातडीने संबंधितांवर कारवाई करावी, अशी परिसरातील नागरिकांची अपेक्षा आहे. 

Web Title: satara news people dangerous health by dranage water