साताराः पेट्रोल पंप लुटणारी टोळी तासाभरात पोलिसांच्या ताब्यात

सचिन शिंदे
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

कऱ्हाड (सातारा): हवेत गोळीबार करून पेट्रोल पंप लुटणाऱ्या टोळीला तालुका पोलिसांनी अवघ्या तासाभरात अटक केली. शुक्रवारी (ता. 11) रात्री वडगाव हवेली येथे प्रकार झाला.

पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून दोन पिस्तल जप्त केली आहेत. ती टोळी आंतरराज्य असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयीतांकडे रात्रभर तपास सुरू आहे. तपासात उघड झालेली माहिती लवकरच देवू, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

सांगली, कोल्हापूर भागात पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचे प्रमाण वाढले होते. त्या पार्श्वभुमीवर तालुका पोलिसांनी गजाआड केलेल्या टोळीचे विशेष महत्व आहे.

Web Title: satara news Petrol pump looting gang arrested in karad