धोमबलकवडी कालव्याचे काम अंतिम टप्यात; १५ ऑक्टोंबरपर्यंत पाणी सुरू

संदीप कदम
रविवार, 10 सप्टेंबर 2017

आठ दिवसांच्या आत उर्वरित काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

फलटण (जि. सातारा) : तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यासाठी वरदान ठरत असलेल्या धोमबलकवडी कालव्याचे काम अंतिम टप्यात असून, पूर्ण कामाच्या लाभ क्षेत्रात १५ ऑक्टोंबरपर्यंत पाणी सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली.

सद्या तालुक्यात धोमबलकवडीच्या कालव्याचे दुधेबावी पर्यंतच्या टप्प्यात काम पूर्ण झाले आहे. तर यापुढील कामासाठी शेतकऱ्यांनी हिरवा खंदील दाखविल्यानंतर आठ दिवसांच्या आत उर्वरित काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. आज हे काम पूर्ण होऊन प्राथमिक पातळीवर विना अडथळा पाणी पुढे तीन किलोमीटरवर असलेल्या पोकळेवस्ती (मिरढे) गावचे हद्दीत जाऊ शकणार आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
आता देताय की जाताय; मराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ
जमिनीच्या वादातून मुलांनीच केला पित्याचा खून
नोटबंदीने देशाची फसवणूक केली : पी. चिदंबरम
राजनाथसिंह काश्‍मीर दौऱ्यावर; मेहबूबा मुफ्तींशी चर्चा
'डेरा'च्या मुख्यालयात फटाक्‍यांचा अवैध कारखाना
स्पर्धा परीक्षांच्या पलीकडं... (संदीप वासलेकर)
मौजा चिंधीमालच्या भिकाऱ्यांचं काय करायचं ? (उत्तम कांबळे)

Web Title: satara news phaltan dhombalkawadi canal water for drought belt

टॅग्स