पोलिसांनी जीपीएसच्या साह्याने 24 तासांत पकडला चोर

सिद्धार्थ लाटकर
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

साताराः गोवा येथे फिरायला जाण्यासाठी मुंबईतून दोघांनी भाडेतत्त्वावर घेतलेली इनोव्हा क्रिस्टा हे वाहन (एम.एच. 01 सी. आर. 5859) चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुलबर्गा येथील सय्यद अब्दुल महम्द खाजा साजीद या संशयितास शाहूपुरी पोलिसांनी 24 तासांत जेरबंद केले आहे. याबाबतची फिर्याद वाहनाचे चालक मोहन महादेव पवार (रा. विरार) यांनी दिली होती.

संशयितांनी चालकास गोवा येथे जाण्यासाठी वेळोवेळी मार्गात बदल करायला लावले. सातारा येथील एका हॉटेलमध्ये थोडासा विसावा घेण्याचा बहाणा करून चालकाच्या अपरोक्ष संशयितांनी वाहनाची चावी घेतली आणि पळ काढला. दरम्यान, या वाहनातील जीपीएस सिस्टीम अद्ययावत होती. यामुळे वाहन चोरीस गेल्यानंतर त्याचे लोकेशन मिळत होते. त्याच्या साह्याने शाहूपुरी पोलिसांच्या पथकाने संगणक कक्ष यांच्या संपर्कात राहून वाहनाचे लोकेशन वेळोवेळी प्राप्त करून संशयितांचा पंढरपूर मार्गे पाठलाग केला. दरम्यानच्या काळात सोलापूर, कर्नाटक येथील पोलिस ठाण्यांना कळविण्यात आले. परंतु, वाहन सापडू शकले नाही. त्यानंतर कर्नाटक व शाहूपुरी पोलिसांनी संयुक्तरित्या कलबुर्गी येथे हे वाहन चालवित असलेल्या सय्यद अब्दुल महम्द खाजा साजीद यास पकडले. त्यास वाहनासह ताब्यात घेऊन अटक करून साता येथे आणले. याबाबतची माहिती शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक श्री. बेदरे यांनी दिली.

Web Title: satara news police gps system car thief arrested