कामांचा जाब द्या, अन्यथा नगराध्यक्ष राजीनामा द्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

सत्ताधाऱ्यांचे काळेबेरे बाहेर निघेल, या भीतीने नगराध्यक्षांनी विरोधकांना सभागृहात बोलू दिले नाही. सर्वसामान्यांच्या प्रतिनिधी म्हणून जनतेने नगराध्यक्षांना मोठ्या अपेक्षेने निवडून दिले. गेल्या दहा महिन्यांत त्यांनी सर्वसामान्यांसाठी काहीही काम केले नाही. त्यांच्या आघाडीतील चार गट त्यांना काम करून देत नाहीत. जनतेचा भ्रमनिरास झाला असून नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपच्या सदस्यांनी पालिकेच्या सभेनंतर माध्यमांशी बोलताना केली.

भाजपचे पक्षप्रतोद धनंजय जांभळे, सिद्धी पवार, विजय काटवटे, प्राची शहाणे, मिलिंद काकडे व ॲड. प्रशांत खामकर उपस्थित होते. त्यांनी सांगितले, ‘‘सर्वसामान्यांनी मोठ्या अपेक्षेने नगराध्यक्षांना निवडून दिले होते. मात्र, त्यांच्याकडून जनतेची निराशा झाली आहे. गेल्या दहा महिन्यांत त्यांनी काय काम केले, याचा जाब जनतेला द्यावा, अन्यथा नगराध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. पालिकेत जनतेचे प्रश्‍न सुटत नाहीत. नागरिकांच्या कामाचे विषय सभेच्या मंजुरीसाठी दिले तर ते अजेंड्यावरच घेतले जात नाहीत. पाठपुरावा केल्यास टोलवाटोलवी केली जाते. सत्ताधारी आघाडीतच चार गट पडले आहेत. विशिष्ट कंपूचेच विकासाचे विषय मंजुरीसाठी ठेवले जातात.’’

सातारकरांच्या पाण्याचा प्रश्‍न अद्याप सुटलेला नाही. एलईडी पथदिव्यांच्या प्रकरणात आर्थिक घोटाळा झाला आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांना कोणीच वाली नाही. मुख्याधिकारी फक्त ॲड. दत्तात्रय बनकर यांचे ऐकून निर्णय घेतात. सार्वजनिक स्वच्छतेबाबत ओरड सुरू आहे. दस्तुरखुद्द राजमातांना पालिकेच्या कामकाजात लक्ष घालावे लागते, इतके सत्ताधारी पदाधिकारी अकार्यक्षम आहेत.’’ आम्ही मंत्र्यांकडे पाठपुरावा करून शहरातील विकासकामासांठी शासनाकडून निधी मंजूर करून आणला. विशिष्ट कामांसाठी मंजूर असलेला हा निधी सत्ताधाऱ्यांच्या ‘हिता’च्या अन्य कामांकडे वळविण्यात येत असल्याचा आरोप यावेळी भाजप सदस्यांनी केला.

नागरिकांच्या कामाचे विषय सभेच्या अजेंड्यावरच घेतले जात नाहीत. पाठपुरावा केल्यास टोलवाटोलवी केली जाते. विशिष्ट कंपूचेच विकासाचे विषय मंजुरीसाठी ठेवले जातात.
- धनंजय जांभळे, पक्षप्रतोद, भाजप

Web Title: satara news politics