पोस्टल व्यवहारांसह टपाल वितरण ठप्प

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

सातारा - गेले सहा दिवस ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने परिणामी ग्रामीण डाक सेवा पूर्णतः ठप्प झाली आहे. या संपामुळे इंडियन पोस्ट पेमेंट बॅंक, सुकन्या समृद्धी योजना, डायरेक्‍ट बेनिफिट ट्रान्स्फर, रिकरिंग डिपॉझिट (आरडी), ग्रामीण टपाल जीवन विमा, पोस्टल बचत खाते यांची कामे, तसेच टपाल वितरणाचे काम थांबले आहे.

सातवा वेतन आयोग त्वरित लागू करावा, निवृत्तीवेतन लागू करण्यात यावे, कायमस्वरूपी कामगारांचा दर्जा देण्यात यावा, या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक युनियनने मंगळवारपासून (ता. २२) संप सुरू केला आहे. संपाचा आज सहावा दिवस होता. जिल्ह्यातील ९०० टपाल कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. या संपाचा सर्वाधिक परिणाम ग्रामीण भागातील टपाल सेवेवर झाला आहे. संपामुळे इंडियन पोस्ट पेमेंट बॅंक, सुकन्या समृद्धी योजना, डायरेक्‍ट बेनिफिट ट्रान्स्फर, रिकरिंग डिपॉझिट (आरडी), ग्रामीण टपाल जीवन विमा, पोस्टल बचत खाते यांची कामे, तसेच टपाल वितरणाचे काम थांबले आहे. संपाच्या पहिल्या दिवशी शहर टपाल कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने ही केली होती. 

कमलेशचंद्र समितीच्या शिफारशी लागू होईपर्यंत हा संप सुरूच ठेवण्याचा ग्रामीण डाक सेवकांचा निश्‍चय आहे. सरकार दर वेळी आश्‍वासने देऊन फसवणूक करीत आहे. 

जिल्ह्यातील 135 कार्यालयांत हजारो पत्र पडून  
जिल्ह्यातील १३५ टपाल कार्यालयांमध्ये हजारो पत्र पडून राहिली आहेत, तसेच स्पीड पोस्ट, रजिस्टरचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांना धनादेश पुस्तक, पासपोर्ट वितरण, नोकरीविषक पत्रे, आधारकार्ड आदी प्राप्त होऊ शकली नाहीत. हा संप लवकर मिटावा, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Web Title: satara news Postal service was completely stop