साताऱ्याची 'दृष्टी' देशात प्रथम

विशाल पाटील
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

'स्वच्छ भारत'मध्ये प्रशांत पांडेकर याच्या लघुपटाची बाजी

सातारा: स्वच्छ भारत अभियानात सातारा जिल्ह्यात देशात डंका वाजविला असताना आता "स्वच्छ संकल्प ते स्वच्छ सिध्दी' या उपक्रमातही साताऱ्यातील प्रशांत पांडेकर याने दिग्दर्शन केलेला "दृष्टी- दी व्हीजन' हा लघुपट देशात प्रथम आला आहे.

'स्वच्छ भारत'मध्ये प्रशांत पांडेकर याच्या लघुपटाची बाजी

सातारा: स्वच्छ भारत अभियानात सातारा जिल्ह्यात देशात डंका वाजविला असताना आता "स्वच्छ संकल्प ते स्वच्छ सिध्दी' या उपक्रमातही साताऱ्यातील प्रशांत पांडेकर याने दिग्दर्शन केलेला "दृष्टी- दी व्हीजन' हा लघुपट देशात प्रथम आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी "स्वच्छ संकल्प ते स्वच्छ सिध्दी' अशी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत घोषणा केली. संपूर्ण देश आरोग्यदायी व स्वच्छ करण्यासाठी नागरिकांनी स्वयंप्रेरणेने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते. त्यासाठी "स्वच्छ भारतासाठी मी करू शकतो/ शकते?' या विषयावर लघुपट, निबंध स्पर्धा घेतली होती. त्यामध्ये प्रशांत पांडेकर (रा. काटेवाडी, ता. खटाव) याने "दृष्टी दी व्हीजन' या लघुपट बनविला. तो साताऱ्यातील लाल बहादूरशास्त्री महाविद्यालयात बीएससीच्या तृतीय वर्गात अध्ययन करत आहे. त्याने येथील समर्थ मंदिर परिसरात हा लघुपट बनविला. त्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप आदींनी अभिनंदन केले. या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत द्वितीय क्रमांक रुपाली महकुड (ओरिसा), तृतीय क्रमांकांचे यश ड्रीम्ज अनलिमिटेड (नागालॅंड) यांनी मिळविले.

असाही उलटा क्रम
"दृष्टी' लघुपटाला जिल्हास्तरावर दुसरा, राज्यात तिसरा क्रमांक मिळाला होता. मात्र, देशस्तरावर तो प्रथम ठरला. एडिटर जमीर आतार, कॅमेरामन शार्दूल आफळे, कॅमेरा अस्टिटंट अक्षय हिरवे, कलाकार जीशन आतार, जयेश साळुंखे, नितीन लोहार, इर्शाद खान यांनी या लघुपटासाठी काम केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: satara news prashant pandekar and swachh sankalp se swachh siddhi