आणखी एका गुन्ह्यात धाराशिवकरला "मोका' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

सातारा - खासगी सावकारीप्रकरणी अटकेत असलेल्या प्रमोद ऊर्फ खंड्या धाराशिवकर व त्याच्या साथीदाराला आज "मोकां'तर्गत दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे. अजित अशोक कुरणे ऊर्फ कुबड्या ऊर्फ वकील असे दुसऱ्या साथीदाराचे नाव आहे. 

याबाबत अलफास सलीम खान (रा. खेड) यांनी फिर्याद दिलेली आहे. त्यांनी 2014 मध्ये खंड्याकडून दर महिना दहा टक्के व्याजाने दोन लाख रुपये घेतले होते. व्याजापोटी दर महिन्याला ते त्याला पैसे देत होते. मात्र, त्यांना वाळू व्यवसायात नुकसान झाले. त्यामुळे ते त्याला पैसे देऊ शकले नाहीत. त्यामुळे खंड्याने त्यांचे दोन ट्रक ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावली. त्यानंतर नगरसेवक बाळू खंदारेने त्यांचा एक ट्रक चालकाला दमदाटी करत ताब्यात घेतला. तो त्याने कोल्हापूर येथे एक लाख 80 हजार रुपयांना भंगारात विकला होता. 

याप्रकरणी खंड्या व बाळू यांच्यासह दहा जणांवर खासगी सावकारीसह इतर कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये "मोका'चे कलम वाढविण्यात आले आहे. दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला खंड्या व अजित या दोघांना पोलिसांनी अटक केली.

Web Title: satara news Private money laundering case