‘रन फॉर हेल्थ’ला सातारकरांचा प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

सातारा - ‘रन फॉर हेल्थ’ असा संदेश देत यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या वतीने आज झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत विद्यार्थी व प्राध्यापक गटात प्रा. सागर तनपुरे यांनी, तर विद्यार्थिनी व प्राध्यापिकांच्या गटात अनिता माळी यांनी पहिला क्रमांक मिळविला. पुरुष विभागात स्वप्नील सावंत यांनी, तर महिला विभागात अंकिता इंगवले यांनी पहिल्या क्रमांकाने यश मिळविले.

यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या वतीने दर वर्षी समाज प्रबोधन करत मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाते. आजच्या स्पर्धेत विद्यार्थी, प्राध्यापक, महिला आणि पुरुष धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी सात वाजता महाविद्यालयापासून स्पर्धेस प्रारंभ झाला. रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते स्पर्धेस प्रारंभ झाला. त्या वेळी जिल्हा क्रीडाधिकारी सुहास पाटील, अभिनेत्री अपर्णा आंबवणे, संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे, इतर पदाधिकारी, प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, उपप्राचार्य डॉ. एच. व्ही. देशमुख, जिमखाना प्रमुख प्रा. संभाजी पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय ते राजवाडा व परत, तर मुली व महिला प्राध्यापिकांसाठी महाविद्यालय ते कमानी हौद व परत महाविद्यालय अशा अंतरात ही स्पर्धा झाली. स्पर्धेसाठी वाहतूक पोलिस, क्रीडा कार्यकर्ते, प्रा. संभाजी पाटील, प्रा. जितेंद्र गुजर, प्रा. भैरव जाधव, इतर प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. 

स्पर्धेतील गटवार विजेते पुढीलप्रमाणे. पुरुष गट - स्वप्नील सावंत, आदिनाथ भोसले, आकाश हिरवे, हर्षवर्धन दबडे, वैभव गयकवाड.
महिला गट - अंकिता इंगवले, प्रांजल माडकर, हर्षदा इंदलकर. 
विद्यार्थिनी व प्राध्यापिका गट- अनिता माळी, पल्लवी भोसले, रेणुका देशमुख. विद्यार्थी व प्राध्यापक गट - प्रा. सागर तनपुरे, प्रा. सुरेश देसाई, प्रा. पंकज मुंदडा.

Web Title: satara news response for run for health