वाहन कसे चालवायचे; चालायचे तरी कुठून!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

सातारा - गेंडामाळ नाका ते शाहूपुरी चौक रस्त्याची दुरवस्था झाली असून, संपूर्ण रस्ता चिखलाने माखला आहे. जागोजागी पडलेले खड्डे, चिखल आणि साचलेल्या पाण्याच्या डबक्‍यामुळे चालायचे कुठून असा प्रश्‍न पादचाऱ्यांना पडला आहे. वाहनचालकांना तर रस्त्यावरील खड्ड्यांमधून कसरत करतच वाहन हाकावे लागत आहे. त्यातून रोज छोट्यामोठ्या अपघातांची भर पडत आहे. 

साताऱ्यातून अनंत इंग्लिश स्कूलमार्गे शाहूपुरीत जाणारा रस्ता २५ ते ३० वर्षांपूर्वी मुरूम- मातीचा होता. पावसाळ्यात संपूर्ण रस्ता चिखलाणे माखलेला असायचा. मोठ्या वाहनांच्या टायरमुळे काही ठिकाणीचा बराचसा चिखल निघूनही जायचा. त्यावर पाय टाकतच लोक पुढे जात होते. या रस्त्यावरून जाताना पादचाऱ्याची तारांबळ उडायची. शालेय विद्यार्थ्यांच्या पाय आणि पाठीवर चिखलाचे शिंतोडे उडायचे. हा रस्ता ओलांडत असताना एखादे भरधाव वाहन आले, तर पादचाऱ्याच्या अंगावर काटा उभा राहायचा. मग अंगावर उडणारे पावसाळी पाण्याचे तुषार झेलतच पादचाऱ्यांना जावे लागायचे. 

वस्ती वाढली, ग्रामपंचायत स्थापन झाली, रस्ते डांबरी झाले. त्याशिवाय मधल्या २५- ३० वर्षांत फारसा फरक पडलेला नाही. गेंडामाळ नाका ते शाहूपुरी चौक हा रस्ता याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. दोन- तीन ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच पावसाचे पाणी साचत आहे. एका ठिकाणी मातीमुळे रस्त्यातच राडारोडा झाला आहे. या रस्त्यावर गेल्या काही दिवसांत छोट्या- मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पादचाऱ्यांबरोबर दुचाकी वाहनचालकांना येथून जाताना कसरत करावी लागते. ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी शाहूपुरीवासियांतून होत आहे. नवनिर्वाचित सदस्य व पदाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Web Title: satara news road issue in satara