मुदतवाढ दिल्यानंतरही ‘आरटीई’ प्रवेश जैसे थे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

सातारा - शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळेतील २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशासाठी चार एप्रिलपर्यंत मुदतवाढ मिळूनही आतापर्यंत केवळ ३३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत. त्यामुळे आगामी काळात रिक्त प्रवेशांसाठी पुन्हा दुसरी व तिसरी सोडत काढण्याचे नियोजन शिक्षण विभागास करावे लागणार आहे. 

या प्रवेश प्रक्रियेची पहिल्या लॉटरीनंतर विद्यार्थ्यांची अल्प प्रवेश निश्‍चिती झाल्याने, शासनाने जास्तीत जास्त बालकांनी प्रवेश नोंदवावेत, यासाठी प्रवेश निश्‍चिती पुन्हा चार एप्रिलपर्यंत वाढवली. आरटीईतील २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी जिल्ह्यातील २३४ शाळांमधील दोन हजार ४६३ जागांसाठी एक हजार ४९७ अर्जांची नोंदणी झाली होती. त्यापैकी केवळ ३३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची नोंद संकेतस्थळावर नमूद आहे. 

लॉटरी पद्धतीने एका यादीत नाव जाहीर झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याचे नाव पुन्हा दुसऱ्या यादीत येणार नाही. नाव जाहीर झाल्यानंतर पालकांना शिक्षण विभागाने दिलेल्या मुदतीतच संबंधित शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे बंधन व अन्य अटींमुळे प्रवेश कमी झाल्याची चर्चा आहे. बहुधा इच्छित शाळेत (किलोमीटर, भाडेकरार) या कारणांमुळेही विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित होऊ शकलेले नाहीत. यामुळे रिक्त जागांवरील प्रवेश निश्‍चित व्हावेत यासाठी शिक्षण विभागास दोन व तीन वेळा लॉटरी काढण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

Web Title: satara news RTE education