सुटीदिवशीही "आरटीओ'मध्ये खाबूगिरी 

प्रवीण जाधव
गुरुवार, 25 जानेवारी 2018

सातारा - "टेस्टिंग ट्रॅक'अभावी पासिंग बंद होणार असल्यामुळे जिल्ह्यातील ट्रॉन्स्पोर्ट वाहन चालकांची बंदी पूर्वी पासिंग करून घेण्यासाठी गडबड उडाली आहे. मात्र, त्यासाठी त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. वाहनचालकांच्या सोयीसाठी सुटीच्या दिवशी होणाऱ्या पासिंगच्या निर्णयाचा फायदा उठविण्याचा खेळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरू असल्याचा आरोप वाहन चालकांकडून होत आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात विविध प्रमाणपत्र देताना होणाऱ्या त्रुटींबाबत उच्च न्यायालयात 2013 मध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीमध्ये "टेस्टिंग ट्रॅक' असल्याशिवाय वाहनांचे पासिंग न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. योग्य पद्धतीचे ट्रॅक तयार करण्यासाठी न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंतची मुदत दिलेली आहे. या मुदतीनंतर "ट्रॅक'शिवाय पासिंग करण्यास न्यायालयाने बंदी घातलेली आहे. सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात "ट्रॅक' उपलब्ध नाही. त्यामुळे या कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या वाहनांचे पासिंग बंद होणार आहे. पासिंग बंद होणार असल्यामुळे अनेक वाहनचालकांचा खोळंबा होणार आहे. व्यवसाय बंद करावा लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे 31 जानेवारीपूर्वी पासिंग होण्यासाठी वाहनचालकांची गडबड सुरू आहे. कार्यालयामध्ये दररोज सुमारे शंभर वाहनांचे पासिंग होते. 31 जानेवारीपर्यंत त्या प्रमाणातच नोंदणी करून घेण्यात आली आहे. त्या व्यक्तिरिक्तच्या वाहनांसाठी सुटीच्या दिवशी पासिंग करण्याचा चांगला पर्याय उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने काढला आहे. त्यामुळे वाहनचालकांची सोय होत आहे. मात्र, या संधीचे सोने करून घेण्याचे काम काही महाभागांकडून सुरू आहे. वाहनचालकांची अडचण आणि त्यांची सोय अशी परिस्थिती झाली आहे. सुटीच्या दिवशी पासिंगसाठी वाहन निरीक्षकांच्या नावावर काहींकडून जादा पैशाची मागणी होत आहे. त्यामुळे शासकीय शुल्का व्यतिरिक्त दीड ते दोन हजार रुपये जादा मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर गडबडीत पासिंगसाठी वाहन आणल्यामुळे काही त्रुटी शिल्लक राहिलेल्या असतात. ज्या त्रुटी कॅमेऱ्यात येत नाहीत त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठीही पैसे मोजावे लागत असल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील या खाबूगिरीवर वरिष्ठांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे. 

जादा पैसे मागितल्यास तक्रार करा - धायगुडे 
वाहन चालकांच्या सोयीसाठी सुटीच्या दिवशी पासिंग सुरू केले आहे. या नोंदणीसाठी कोणत्याही एजंटकडे जाण्याची आवश्‍यकता नाही. थेट कार्यालयाशी संपर्क साधावा. कोणी जादा पैशाची मागणी केल्यास माझ्याकडे तक्रार करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी केले. या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असेही ते म्हणाले.

Web Title: satara news rto