दासनवमीसाठी सज्जनगड गजबजला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

सातारा - सज्जनगड येथील उत्सव उत्साहात सुरू असून शुक्रवारी (ता. ९) होणाऱ्या मुख्य दासनवमी उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. उत्सव काळात दररोज होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना भाविकांची गर्दी होत आहे.

उत्सवानिमित्त पहाटे अभिषेक, आरती असे कार्यक्रम झाल्यानंतर दररोज सकाळी आठ ते नऊ या वेळेत प्रवचन, सांप्रदायिक भजन, छबिना (पालखीची मंदिर प्रदक्षिणा) त्यानंतर मंदिराला १३ प्रदक्षिणा, प्रवचन, दुपारी साडेबारा वाजता महाप्रसाद, विविध कलकार (गायन, वादन) कला सादर करत आहेत. दुपारी तीन वाजता कीर्तन आणि सायंकाळी सहा ते रात्री ११ या वेळेत करुणाष्टके, उपासना, आरती, छबिना, कीर्तन असे कार्यक्रम होत आहेत.

शुक्रवारी दासनवमीसाठी विविध भागांतून हजारो भाविक येतात. भाविकांचा ताण सज्जनगडावरील सर्वच यंत्रणांवर पडतो. मात्र, भाविकांना कोणत्याही त्रासांना सामोरे जाऊ लागू नये, यासाठी उत्सव समितीने सर्व व्यवस्था केली आहे. सज्जनगडावर पाण्याची एकूण चार तळी आहेत. त्यापैकी एका तळ्यातील पाणी पिण्यासाठी वापरतात. त्यामध्ये मुबलक पाणी आहे, अशी माहिती समर्थ रामदासस्वामी संस्थानचे अध्यक्ष भूषण स्वामी यांनी दिली. शुक्रवारी पहाटे समाधीला अभिषेक झाल्यानंतर इतर दैनंदिन कार्यक्रम होतील. त्यानंतर छबिना व मंदिर प्रदक्षिणा घातल्या जातील. 

दुपारी १२ वाजता समर्थांची निर्याण कथा होणार असून त्यानंतर महाप्रसाद वाटप होईल.

सज्जनगडावर जाण्यासाठी बसची सोय
दासनवमीदिवशी सातारा बस स्थानक व राजवाडा बस स्थानक येथून जादा गाड्यांची सोय केली जाणार आहे. सातारा-चाळकेवाडी रस्त्यावर मोठ्या संख्येने येणाऱ्या वाहनांची कोंडी होऊ नये, यासाठी घाटाच्या पहिल्या टप्प्यावर समर्थसृष्टी येथे खासगी वाहने थांबविली जाणार असून, तेथून सज्जनगड येथे जाण्यासाठी एसटीची सोय केली जाणार आहे.

Web Title: satara news sajjangad dasnavami utsav