तलावातील पाणीसाठ्याने हरकले ग्रामस्थ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

खटाव - महात्मा फुले यांची कुलभूमी असलेल्या कटगुण (ता. खटाव) येथे सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून बाबूराया तलावातील गाळ काढण्यात आल्याने तलावात पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. तलाव्यात झालेला पाणीसाठा पाहून ग्रामस्थ हरकून गेलेत. कटगुणच्या तनिष्का व्यासपीठ सदस्यांनी घेतलेल्या पुढाकाराने उन्हाळ्यात ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबणार आहे. 

कटगुणमध्ये 1972 च्या दुष्काळात झालेल्या तलावाची दुरुस्ती व्हावी, अशी ग्रामस्थांची इच्छा होती. तनिष्का गटप्रमुख सुषमा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सकाळ रिलीफ फंडाकडे निधीसाठी प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले. जेसीबा, डंपर व ट्रॅक्‍टरच्या मदतीने आठवडाभरात गाळ काढून तो आजूबाजूच्या शिवारात वापरण्यात आला. 

गेला आठवडाभर पडत असलेल्या पावसामुळे गाळमुक्त झालेल्या तलाव्यात एवढे पाणी पहिल्यांदाच साठले आहे. या तलावाची आजअखेर दुरुस्ती नसल्याने पाणी टिकून राहत नव्हते. "सकाळ'ने केलेल्या मदतीमुळे कित्येक वर्षांनी तलाव पूर्णक्षमतेने भरल्याचे पाहून कटगुणकरांना आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया उपसरपंच उदय कदम, डॉ. विवेक गायकवाड, प्रकाश गोरे यांनी दिली. तलावाच्या दुरुस्तीच्या कामाने पाण्याचा फुगवटा वाढून बंधाऱ्याजवळील ओढे, विहिरी, कूपनलिका पुनरुज्जीवित होणार आहेत. 

सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून तलावातील गाळ काढण्याचे मोठे काम झाले आहे. तलाव्यातील पाणीसाठा पाहून तनिष्कांना खूप आनंद होत आहे. तलावातील पाणीसाठ्यामुळे शेतीसह घरगुती वापराच्या पाण्याची समस्या दूर होईल. 

- सुषमा गायकवाड, गटप्रमुख, तनिष्का व्यासपीठ, कटगुण 

Web Title: satara news Sakal Relief Fund water