‘शाळासिद्धी’त सातारा तिसरा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

सोलापूर प्रथम, तर सिंधुदुर्ग दुसरा; जिल्ह्यात ४५ टक्के शाळांना ‘अ’ दर्जा
सातारा - राज्यातील सर्वच शाळांसाठी मूल्यमापनाची पद्धत एकच असावी, यासाठी शिक्षण विभागाने गेल्या शैक्षणिक वर्षापासून ‘शाळासिद्धी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात शाळांची सर्वच प्रकारच्या माहितीची नोंद घेतली जाते. त्यात सातारा जिल्हा तिसरा क्रमांकावर राहिला आहे, तर सोलापूर जिल्हा प्रथम व सिंधुदुर्ग जिल्ह्याने दुसरा क्रमांक मिळविला. साताऱ्यातील ४५.६८ टक्के शाळांना ‘अ’ दर्जा मिळाला आहे. 

शिक्षण विभागाने ‘शाळासिद्धी’ हा उपक्रम सुरू करण्यापूर्वी राज्यभर शाळांच्या मूल्यमापनासाठी ‘आयएसओ’ पद्धत रूढ झाली होती. मात्र, या पद्धतीत शैक्षणिक गुणवत्तेचा फारसा विचार केला नव्हता. केवळ शाळेची भौतिक स्थिती तपासून शाळेला ‘आयएसओ’ मानांकन दिले जात होते. त्यामुळे शाळेची केवळ भौतिक प्रगती झाल्याचे स्पष्ट दिसत होते. मात्र, या शाळासिद्धी उपक्रमामुळे शाळेची भौतिक व शैक्षणिक गुणवत्ता स्पष्ट होणार आहे.

२०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून हा उपक्रम सुरू केला आहे. ‘शाळासिद्धी’मध्ये सात क्षेत्रांचा समावेश केला आहे. या सात क्षेत्रांच्या आधारे ऑनलाइन माहिती भरायची आहे. शाळांच्या निवडीसाठी चार स्तर आहेत. ९१ ते १०० टक्के गुण मिळविलेल्या शाळेला ‘अ’, ८१ ते ९० टक्के गुण मिळविलेल्या शाळेला ‘ब’, ६१ ते ८० टक्के गुण मिळविलेल्या शाळेला ‘क’, तर ४१ ते ६० टक्के गुण मिळविलेल्या शाळेला ‘ड’ दर्जा दिला आहे. त्यातील काही शाळांनी नोंदी केल्या असतानाही माहिती भरलेली नाही.

...अशी आहे 
शाळांची वर्गवारी

‘अ’ वर्ग    १७६६ 
‘ब’ वर्ग    १९७४ 
‘क’ वर्ग    १५० 
‘ड’ वर्ग    ३७ 
एकूण    ३८६७ 

Web Title: satara news satara second in shalasiddhi