..अन्‌ ती शाळा झाली शब्दांची बॅंक

विशाल पाटील
बुधवार, 14 जून 2017

इंग्रजी, गणित विषयांत विद्यार्थ्यांची समृद्धता; लोकसहभागही वाढतोय 

सातारा - मराठी शाळा म्हटले, की बहुतेक मुलांना इंग्रजीचा गंधच येत नाही, ते नुसतेच इंग्रजी पुस्तके पाहात असतात... हा भ्रम खोटा ठरवला आहे, तो जावळी तालुक्‍यातील धनगरवस्ती (मरड मुरे) या शाळेने. २०१४ मध्ये बदलला सुरवात झालेली ही शाळाच ‘शब्दांची बॅंक’ बनली. ‘माय वर्ड बॅंक’ या उपक्रमातून प्रत्येक विद्यार्थ्यांकडे हजारहून अधिक शब्दांची संपत्ती साचली आहे. 

धनगरवस्ती शाळेत जुलै २०१४ मध्ये अवघी दहा मुले होती. त्यांची आर्थिक परिस्थिती जशी बेताची तशीच शैक्षणिक स्थितीही बेताची होती. मुलांना इंग्रजीची पुस्तके ही चित्र पाहण्यासाठीच आवडत. ती वाचायची असतात, इंग्रजीत लिहायचे असते, हे त्यांना माहीतच नव्हते. मुलांजवळ इंग्रजी शब्दांचा साठा असल्याशिवाय मुलांच्यात आवड निर्माण होत नाही, याचा विचार शिक्षक नितीन मोहिते यांनी केला. शाळेच्या अंगणात भल्यामोठ्या रंगीत माशाचे चित्र काढून, त्याच्या खवल्यामध्ये इंग्रजी मुळाक्षरे काढून, मुलांना जोड्या लावा, अक्षरे रंगवा, अक्षरे ओळखा यांसारख्या खेळातून त्यांनी अक्षरांची ओळख करून दिली. अक्षरांच्या दृढीकरणासाठी पाठ्यपुस्तकातील अक्षराला गोल करण्याचा खेळ घेण्यात आला. 

मुलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने परिसरातील लोकांची मदत घेऊन त्यांना वह्या, पेन, पेन्सिल उपलब्ध करून दिली गेली. ऐवढे करूनही मुलांना इंग्रजी शब्द पाठ होत नव्हते. त्यामुळे ‘माय वर्ड बॅंक’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. प्रत्येक मुलाला एक प्लॅस्टिकची बरणी देऊन त्यावर त्याचे छायाचित्र चिटकविण्यात आले.  पान ४ वर 
 
...हे गवसले
शाळेस आयएसओ मानांकन
‘प्रगत शैक्षणिक’मध्ये १०० टक्‍के प्रगत
प्रत्येक मुलांकडे हजाराहून अधिक शब्द
शब्दांवरून मुले करतात वाक्‍यरचना
माझी लेखन उपक्रमातून हस्ताक्षर सुधारणा

Web Title: satara news school is word bank