आटपाडी आगाराची बस नदीत कोसळून वृद्धा ठार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

आटपाडी - आटपाडी आगाराची आटपाडी-पुणे बस सकाळी साडेनऊ वाजता दहीवडी (जि. सातारा) येथे चालकाचा ताबा सुटून माणगंगा नदीच्या पुलावरून पंचवीस फूट खोल नदी पात्रात पडली. अपघातात सावित्री ईश्‍वर जाविर (वय 70, रा. नाझरे, ता. सांगोला) यांचा मृत्यू झाला. अन्य चौदाजण जखमी झाले. पैकी पाचजणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर सातारा येथे उपचार सुरू आहेत. 

आटपाडीतून सकाळी साडेआठला बस निघाली. गाडीत चालक-वाहकासह पंधराजण होते. दहीवडीत पुलावरून गाडी जात असताना समोरून ट्रक आला. त्याने कट मारल्यामुळे बसचालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी सरळ पुलाखाली पात्रात पंचवीस फूट खोल कोसळली. गाडी एका बाजूला कलंडली. गाडीतील प्रवासी उलटे-सुलटे एकमेकांच्या अंगावर पडले. गोंधळ सुरू झाला. काहीवेळात ग्रामस्थांची गर्दी झाली. त्यांनी जखमींना तत्काळ बाहेर काढून दहीवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. जखमी वृद्धेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तिची ओळख अजून पटलेली नाही. अन्य पाच प्रवाशांची प्रकृती गंभीर बनल्यामुळे त्यांना सातारा येथे हलवण्यात आले. अन्य लोकांना काही खासगी दवाखान्यात हलवले. पडळकरवाडीचे दगडू आकाराम गोडर वाहक होते. चालकाचे नाव समजू शकले नाही. प्रवासी किसन लक्ष्मण जावीर (आटपाडी), महादेव अप्पा अहिवळे (खवासपूर ता. सांगोला), प्रल्हाद हनुमंत सरतापे( हिंगणी, ता. सांगोला), कोमल गोविंद कोकरे (आटपाडी), फिरोझ मुबारक पठाण (हिंगणे), विजय रामदास साबर(धुळे), राजिया सिंकदर मुल्ला (पुळकोटी, ता. दहिवडी), राजू दत्तात्र्य घोरपडे (दहीवडी) जखमी झाले आहेत. अन्य चौघा जखमींची नावे समजू शकली नाहीत. 

Web Title: satara news st bus