एसटी महामंडळाचा खासगीकरणाचा डाव: पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

एसटीची खासगीकरणाकडे वाटचाल सुरु करण्यात आली आहे. त्यांचा तोच डाव असुन त्यामुळेच सरकारकडुन कर्मचाऱ्यांच्या संपाचा फारसा विचार केला जात नाही. एसटी महामंडळाची वाटचाल चुकीच्या पध्दतीने सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत.

कऱ्हाड : एसटी महामंडळाची खासगीकरणाकडे वाटचाल सुरु करण्यात आली आहे. त्यांचा तोच डाव असुन त्यामुळेच सरकारकडुन कर्मचाऱ्यांच्या संपाचा फारसा विचार केला जात नाही. एसटीची वाटचाल चुकीच्या पध्दतीने सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यात रास्त आहेत. याप्रश्नी मुख्यमंत्र्याना भेटुन कर्मचाऱ्यांना न्याय मिळवुन देवु. एेन दिवाळीत प्रवाशांचे होणारे हाल आणि कर्मचाऱ्यांचा विचार करुन मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी लक्ष घालुन तातडीने मार्ग काढावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला केले.

एसटी कर्मचाऱ्यांचा तीन दिवसापासुन संप सुरु आहे. आज चव्हाण यांनी संपकरी कर्मचाऱ्यांशी भेटुन चर्चा केली. त्यानंतर ते बोलत होते. मलकापुरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कामगार संघटनांचे प्रतिनिधी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कर्मचाऱ्यांच्यानी आमच्या प्रश्नाकडे परिवहन खात्याने आजपर्यंत दुर्लक्षच केले आहे. आम्ही ज्यावेळी एसटीमध्ये नोकरीस लागलो त्याचेवेळी लागलेल्या शिक्षकांना ७० ते ८० हजार पगार आहेत आम्ही अजुनही २० हजारांतच काम करतोय. आम्हीपण लोकांचेच कामच करत आहोत. त्याचबरोबर एसटीत अनेक गैरप्रकार सुरु आहेत. त्याचा त्रास कर्मचाऱ्यांना होत आहे. नवीन बस घेण्यात आल्या आहेत त्यालाही महामंडळाने पैसे द्यायचे आहेत, वाढीव दराने मशीन खरेदी केल्या आहेत, संपामुळे अन्य डेपोच्या बस कऱ्हाड आगारात लावण्यात आल्या आहेत. त्याच्या चालकांनाही कर्मचाऱयांच्या विश्रांतीसाठी असलेल्या कक्षात झोपु दिले जात नाही, अशी क्रुर वागणुक दिली आज आहे यासह अन्य प्रश्नांचा पाढाच वाचला.

त्यावर चव्हाण म्हणाले, एसटीची खासगीकरणाकडे वाटचाल सुरु करण्यात आली आहे. त्यांचा तोच डाव असुन त्यामुळेच सरकारकडुन कर्मचाऱ्यांच्या संपाचा फारसा विचार केला जात नाही. एसटी महामंडळाची वाटचाल चुकीच्या पध्दतीने सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. याप्रश्नी विरोधी पक्ष म्हणुन काॅंग्रेस पक्षामार्फत मुख्यमंत्र्याना भेटुन कर्मचाऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी निश्चीत प्रयत्न करु. मात्र एेन दिवाळीत प्रवाशांचे हाल होत आहे. मात्र प्रवाशाही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करुन त्यांना साथ देतील. कर्मचाऱ्यांचा सकारात्मक विचार करुन मुख्यमंत्र्यांनी स्वतःसह अर्थमंत्री आणि परिवहन मंत्र्यांची समिती नेमुन त्यावर तातडीने मार्ग काढावा. येणाऱ्या विधानसभा अधिवेषणात कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडुन त्यांना न्याय मिळवुन देण्याचे काम करु. 

Web Title: Satara news ST workers agitation