तंदरूस्त बंदोबस्त उपक्रम पोलिस दलाला बळ देणारा: विजय पवार

सचिन शिंदे
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

शहर पोलिस ठाण्यात विसर्जन मिरवणुकीवेळी पोलिसांना तंदरूस्त बंदोबस्त उपक्रमातंर्गत चिक्कीचे वाटप झाले. त्यावेळी ते बोलत होते. पोलिस उपादिक्षक नवनाथ ढवळे, पोलिस निरिक्षक प्रमोद जाधव, पोलिस निरिक्षक राजकुमार राजमाने, ढाणेज मेघा इंजिनिअरिंग क्लासचे येथील राहूल यादव, जाहीरात विभागाचे प्रदीप राऊत, प्रभाकर पवार उपस्थित होते. 

कऱ्हाड : गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना ताकद येण्यासाठी दै. सकाळ राबवत असलेला तंदरूस्त बंदोबस्त उपक्रम पोलिस दलाला मानसिक व शारिरीक बळ देणारा आहे, असे मत अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार यांनी व्यक्त केले. 

येथील शहर पोलिस ठाण्यात विसर्जन मिरवणुकीवेळी पोलिसांना तंदरूस्त बंदोबस्त उपक्रमातंर्गत चिक्कीचे वाटप झाले. त्यावेळी ते बोलत होते. पोलिस उपादिक्षक नवनाथ ढवळे, पोलिस निरिक्षक प्रमोद जाधव, पोलिस निरिक्षक राजकुमार राजमाने, ढाणेज मेघा इंजिनिअरिंग क्लासचे येथील राहूल यादव, जाहीरात विभागाचे प्रदीप राऊत, प्रभाकर पवार उपस्थित होते. 

श्री. पवार म्हणाले, पोलिसांवर मोठ्या जबाबदाऱ्या असतात. त्या जबाबदाऱ्यांची जाणीव समाजातील अनेक सजग लोकांनो होत आहे. त्याची जाणीव सकाळ वृत्तपत्र समुह व त्यांच्या सोबतच्या संस्थाना होत आह.. ही बाब अतंत्य महत्वाची आहे. गणेशोत्सवात पोलिसांवर असलेला ताण लक्षात घेवून त्यांना तंदरूस्त अन्नाचे घटक देण्याचा सकाळचा सहा वर्षापासूनचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. त्यांने पोलिस खात्याला मानसिक व शारिरीक बळ निश्चीत मिळेल. असे उपक्रम राबवून सकाळने समाजात वेगळो स्थान निर्माण केले आहे. 

ढाणेज् क्लासचे श्री. यादव म्हणाले, पोलिस व समाज यांच्यातील समन्वय अधिक दृढ व्हावा, यासाठी आमच्या क्लासतर्फे उपक्रम हाती घेण्याचा मानस होता. तो मानस सकाळच्या माध्यमातून आम्ही पूर्णत्वास नेत आहोत. त्या उपक्रमात आम्ही सक्रीय आहोत. याही व्यतिरिक्त उपक्रमात सहभागी होवू. 

यावेळी पोलिस अधीक्षक श्री. पवार, पोलिस उपाधीक्षक श्री. ढवळे, पोलिस निरिक्ष श्री. जाधव, श्री. राजमाने यांच्याहस्ते पोलिस ठाण्यात उपलब्ध पोलिस कर्मचाऱ्याना चिक्कीचे वाटप केले. श्री. राऊत यांनी सुत्र संचालन केले. प्रभाकर पवार यांनी आभैर मानले.

Web Title: Satara news tandurast bandobast in karhad