कऱ्हाड चिपळूण मार्गावर ट्रेलरला अपघात; मोठी वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 फेब्रुवारी 2018

पाटण - कऱ्हाड ते चिपळून रस्त्यावर अवजड मशीनरी घेवून निघालेला ट्रेलर रस्त्यात रूतला. काल रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला. त्यामुळे सुमारे दहा तासापेक्षाही अधिक काळ या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की किसरूळेच्या वळणावरच  मोठी मशिनरी घेवून निघालेला ट्रक वळताना रस्त्याच्या कडेला रूतला. कोयना ते हेळवाक दरम्यानच्या ढाणकल-किसरूळे येथे हा अपघात झाला. यामुळे काल रात्री अकरापासून चिपळूनकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तो ट्रेलर काढण्याचे प्रयत्न पोलिस व सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे. मात्र त्यात त्यांना अपेक्षीत यश सकाळपर्यंत आले नव्हते.

दरम्यान, लहान वाहने कोयना बस स्थानक या जुन्या मार्गाने मार्गस्थ केली होती. तेथेही वाहतूकीची कोंडी झाली. तीही सुरळीत करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत होती. सकाळी सकाळी आठ वाजल्यापासून कोयना प्रकल्प नवजा येथील पंचधारा भुयार वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे. सध्या यामार्गे वाहतूक सुरू आहे.

Web Title: Satara News traffic jam on Karad - Chiplun road