शिवथरमधील दोघे गुंड चार तालुक्‍यांतून तडीपार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

सातारा - सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा जमाव जमवून मारामारी करणे, जाळपोळ करणे, सार्वजनिक मालमत्तेस नुकसान करणाऱ्या टोळीचा मुख्य आकाश साबळे व सदस्य निखिल साबळे या दोघांना पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी चार तालुक्‍यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे.

याबाबत सातारा पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, आकाश संदीप साबळे (वय 20), निखिल शंकर साबळे (वय 20, दोघेही रा. शिवथर, ता. सातारा) या दोघांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव काळात बेकायदेशीर जमाव जमवून जाणूनबुजून मोटारसायकल पेटवून नुकसान केले. त्यानंतर त्यांनी तीच मोटारसायकल सार्वजनिक गणेश मंडळाच्या शेडसमोरील रस्त्यावर आडवी पाडून इतरांच्या जीविताला धोका होईल, असे कृत्य केले. पेटलेल्या गाडीवर फटाक्‍यांच्या बॉक्‍स फोडून हातात तलवार घेऊन गाडीवर तलवारीने वार केले. या दोघांनी दहशत निर्माण केली म्हणून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, या दोघांना वेळोवेळी अटक करून, प्रतिबंधक कारवाई करून सुधारण्याची संधी देण्यात आली होती, तरीही त्यांच्या वर्तनात फरक पडला नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने मागणी होत होती. सातारा तालुका व वाठार हद्दीत हिंसक घटना घडून भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून या दोघांनाही हद्दपार करण्याबाबत पोलिस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार ही कारवाई झाली. दोघांनाही सातारा, कोरेगाव, जावळी, वाई या चार तालुक्‍यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

Web Title: satara news two gund tadipar crime