खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रवादीचेच - सुनील तटकरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

सातारा - खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीने बाजूला ठेवण्याचा प्रश्‍नच नाही. ते पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. अलीकडच्या काळात त्यांच्याबाबत काय घडले, ते मला माहीत नाही. 11 जूनपासून होणाऱ्या जिल्हानिहाय दौऱ्यात याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिले.

पक्षाचे खासदार असूनही उदयनराजे पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होत नाहीत. जिल्हा परिषद निवडणुकीपासून त्यांना बाजूला ठेवले आहे. त्यांच्यावर खंडणीसारखा गुन्हा दाखल झाला आहे. पक्षीय पातळीवर त्यांच्याबाबत कोणती कारवाई झाली आहे का, या प्रश्‍नाला उत्तर देताना तटकरे म्हणाले, 'उदयनराजेंना बाजूला ठेवण्याचा प्रश्‍नच येत नाही. ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर खासदार म्हणून निवडून आलेले आमचे खासदार आहेत. पक्ष व संघटनेशी संबंधित निर्णय घेताना होणाऱ्या बैठकींना ते उपस्थित असतात. मध्यंतरी एका बैठकीला ते नव्हते. इतर वेळी ते उपस्थित होते; पण त्यांच्यावरील गुन्ह्यासंदर्भात मला माहिती दिलेली नाही. त्यामुळे त्याविषयी मी अधिक भाष्य करू शकत नाही. 11 जूनला होणाऱ्या जिल्हानिहाय दौऱ्यावेळी आम्ही सर्व माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेऊ.''

संपूर्ण राज्यात सातारा जिल्ह्याने राष्ट्रवादीला पाठबळ दिले आहे. त्यामुळे या जिल्ह्यावर आमचे विशेष लक्ष आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: satara news udayanraje bhosale in ncp