यशवंत महोत्सव झाला कऱ्हाडकरांचा : चरेगावकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

कऱ्हाड (सातारा): यशवंत बॅंकेच्यावतीने दरवर्षी आयोजीत करण्यात येत असलेल्या यशवंत महोत्सवात कऱ्हाडकरांची मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे यशवंत महोत्सव हा कऱ्हाडकरांचा झाला याचा मोठा आनंद आहे, असे गौरवोद्गार राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष आणि बॅंकेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी आज (गुरुवार) येथे काढले. यापुढेही महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, पंडीत आनंद भाटे यांनी सादर केलेल्या गायनाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.

यशवंत बॅंकेच्यावतीने आयोजीत यशवंत महोत्सवास आज सायंकाळी प्रारंभ झाला. विठ्ठल रुक्मीणी देवस्थानचे अध्यक्ष व भाजपचे चिटणीस अतुल भोसले, नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, अमरसिंह पाटणकर, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई, मुकुंद उर्फ शार्दुल चरेगावकर, सुनिल फलटणकर, रविंद्र टोणपे यांच्यासह बॅंकेचे संचालक, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. श्री. चरेगावकर म्हणाले, आपण समाजाचे काहीतरी देण लागतो या उद्देशाने यशवंत बॅंकेमार्फत सर्वांच्या सहकार्यातुन नागरिकांसाठी यशवंत महोत्साचे आयोजन केले जाते. महोत्सवाचे यंदाचे आठवे वर्ष असुन दरवर्षी महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हा महोत्सव कऱ्हाडकरांचा महोत्सव झाला आहे याचा मोठा आनंद वाटतो. महोत्सवात शंकराचार्य स्वामी विद्या नृसींह भारती यांचे आशिर्वचन आणि उद्यापासुन शनिवारपर्यंत दररोज सायंकाळी साडेसहा वाजता प्रितिसंगम घाटावर जोतिषाचार्य पंडीत अतुलशास्त्री भगरे यांचे संगीतमय शिव-राम-कृष्ण कथा हा कार्यक्रम होईल. भाजपचे चिटणीस श्री. भोसले म्हणाले, यशवंत महोत्सवातुन संस्कृती आणि संस्कार जोपासण्याचे काम शेखर चरेगावकर यशवंत बॅंकेच्या माध्यमातुन करत आहेत. अशा प्रकारच्या महोत्सवांची आज समाजाला गरज आहे. यापुढेही हा महोत्सव दिमाखात होईल आणि त्यासाठी राज्यातील नामवंत कलाकार आणण्यासाठी सहकार्य करु. नगराध्यक्षांनी अशा कार्यक्रमांसाठी प्रितिसंगम घाटावार खुले व्यासपिठ उभारण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा.

यावेळी पंडीत आनंद भाटे यांनी सादर केलेला पंडीत भिमसेन जोशी यांच्या अभंग आणि नाट्यगितांचा सुरानुभव देणाऱ्या कार्यक्रमाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. श्रीकृष्ण जोशी यांनी सुत्रसंचालन केले.

Web Title: satara news yashwant mahotsav yashwant bank