रुग्णालयातील व्हायरल चित्रफित प्रकरणाचा मागविला अहवाल

सिद्धार्थ लाटकर
सोमवार, 22 जानेवारी 2018

सातारा ः क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुगणालयातील प्रिझनर्स वॉर्डमधील संशयित आरोपींचा नृत्य करतानाचा व्हायरल झालेल्या चित्रफितीची अनुषंगाने पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी त्या दिवशी कामावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे. तो मिळताच योग्य ती कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले. त्याच बरोबर नृत्य करणारे हे रुग्ण नाहीत असे प्रथम दर्शनी वाटते असे न्यायालयास कळविणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

सुरुची धुमश्‍चक्रीप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थकांना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यातील काही संशियत आरोपी हे छाती दुखत असल्याचे सांगत अनेक दिवसांपासून जिल्हा रुगणालयातील प्रिझनर्स वॉर्डमध्ये दाखल होते. त्यातील काहीजण नृत्य करीत असल्याची चित्रफित सोशल मिडियावर व्हायरल झाली. यामध्ये काही जण मोबाईलद्वारे व्हिडिओ क्‍लिप काढत असल्याचे दिसत आहेत. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍न निर्माण झाले आहे.

Web Title: satara news zilla hospital viral video and police report