अरे वाऽऽऽ आता बिनधास्तपणे न्याहाळा "ते' सौंदर्य

अरे वाऽऽऽ आता बिनधास्तपणे न्याहाळा "ते' सौंदर्य
Updated on

कास (जि.सातारा) : होय, तोच तो भांबवलीतील वजराई धबधबा. ज्याबद्दल आपण बोलतोय. तो आता पॅगोडातून पाहता येणार आहे. कोरोनामुळे पॅगोडा, वॉच टॉवर व भांबवली रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अर्धवट राहिले होते. पण, आता सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाने कामगारांसाठी आवश्‍यक पास वितरित केल्याने पॅगोडाचे काम पूर्णत्वास आले आहे. तर रस्त्याचे डांबरीकरण व वॉच टॉवरचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. 

भांबवली वजराई धबधबा आता पर्यटन विकासासाठी सुसज्ज होत आहे. वॉच टॉवर व पॅगोडातून धबधब्याच्या थ्रिलींगचा अनुभव या हंगामात घेता येईल. भांबवली गावापर्यंत रस्त्याचे डांबरीकरणही चालू असून, कच्च्या रस्त्यामुळे होणारी पर्यटकांची अडचणही दूर होणार आहे. 

भांबवली वजराई धबधब्याला ता. पाच जानेवारी 2018 रोजी "क' वर्ग पर्यटनस्थळ म्हणून जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली. त्यानंतर धबधब्याच्या विकासाचे काम सुरू झाले. पहिल्या टप्प्यातील पायऱ्या व रेलिंगचे काम गेल्या वर्षी पूर्ण झाले. त्यामुळे घनदाट जंगल व दुर्गम डोंगरातून जाताना पर्यटकांना कराव्या लागणाऱ्या घसरगुंडीची गैरसोय दूर झाली.

दुसऱ्या टप्प्यातील पॅगोडाचे काम पूर्ण झाले असून, वॉच टॉवरचे काम युध्दपातळीवर सुरू झाले आहे. धबधब्याच्या प्रचंड पाण्याच्या प्रपाताचा अनुभव वॉच टॉवर व पॅगोडातून घेता येणार आहे. पर्यटकांना पावसाळ्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी भांबवली ही आगामी काळात पर्वणीच ठरणार आहे. 

भांबवली वजराई धबधब्याच्या विकासासाठी सौर दिवे, तिकीटगृह, बेंच, शौचालय, स्वच्छतागृह, पायवाट, वॉटर एटीएम, माहिती फलक, स्वागत कमान इत्यादी कामे मंजूर झाली असून, लवकरच निधी उपलब्ध झाल्यास पर्यटकांना चांगल्या सोई-सुविधा मिळणार आहेत. 

तांबी- भांबवली रस्त्याचे डांबरीकरण अंतिम टप्प्यात आहे. पर्यटकांना सर्व आधुनिक सुविधा पुरविण्याचा प्रयत्न आहे. भांबवलीतील पर्यटनवाढीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. 
-शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार 

निसर्गाचा विशेष आविष्कार लाभलेल्या भांबवलीकडे उगवते हिलस्टेशन म्हणून पाहिले जाते. भांबवली हिलस्टेशन विकासासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावा, अशी स्थानिकांची मागणी आहे. 
-रवींद्र मोरे,  
पर्यटनप्रमुख, सह्याद्री पठार विभाग विकास संघ, सातारा. 

Coronavirus : जिवाचा धोका पत्करुनही परिचारीका तीन महिने पगारविना

आक्रित घडलं...ती दोन वर्षांनी सापडली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Red Bull Breaks the Ritual Barrier as Salgare Preserves 202-Year Bendur Tradition
Sangli Anti Corruption Bureau trap
Latest Koyna Dam storage report
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com