सातारा : जिल्हा परिषद शाळांत प्रवेश घ्या ऑनलाइन

सातारा : जिल्हा परिषद शाळांत प्रवेश घ्या ऑनलाइन
Updated on

सातारा : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रवेश प्रक्रियेची गर्दी टाळून जिल्हा परिषदेने आगामी शैक्षणिक वर्षातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील पहिली ते आठवीची प्रवेश प्रक्रिया पूर्णत: ऑनलाइन राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नागरिकांना एक लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
दर वर्षी एप्रिल व मे महिन्यामध्ये जिल्हा परिषद शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. सध्या कोरोना संसर्गाची भीती असल्याने सर्व शाळांना सुटी आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्यासही मनाई करण्यात आली आहे. गर्दी होईल अशा कोणत्याही प्रक्रिया करण्यासही बंदी आहे. त्यामुळे शाळा प्रवेशांचे होणार काय असा प्रश्‍न होता. त्यावर सध्या जिल्हा परिषदेने आपल्या शाळांमधील प्रवेश प्रक्रियेबाबत काय करता येईल यावर चर्चा केली. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे व मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांचा समावेश होता. त्यांच्या संकल्पनेतून या वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय झाला आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील नागरिकांसाठी https://forms.gle/dk82PaSoZo4gx19a8 या लिंकवर जाऊन अर्ज भरावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी केले आहे. त्याचबरोबर 15 ऑक्‍टोबरपर्यंत सहा वर्ष पूर्ण होत असलेल्या मुलांसाठीच पहिलीसाठी अर्ज करावे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

ग्रामीण भागातील राेजगाराची संधी खूली

हॅलाे...यांचे हे राेजचेच सुरु आहे...थकले आता मी...काय करु

गुड न्यूज : कऱ्हाडकरांना मिळणार घरपोच दूध; त्यासाठी एक फाेन करा

बिगब्रेकिंग बिगब्रेकिंग : पाच रुग्णांचे रिपाेर्ट पाॅझिटिव्ह; सातारा काेराेनाबाधित सव्वीसवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Koyna Dam released water through its spillway gates for the first time this monsoon after the reservoir level increased due to continuous rainfall.
RBI penalty on Sangli District Central Cooperative Bank
Almatti Dam Supreme Court dispute
Shashikala Jolle complaint to Nitin Gadkari
Marathi News Esakal
www.esakal.com