खून झालेल्या अमरावतीच्या कामगाराचे नातेवाईकच सापडेनात

खून झालेल्या अमरावतीच्या कामगाराचे नातेवाईकच सापडेनात

कोरेगाव : जळगाव (ता. कोरेगाव) हद्दीत गुरुवारी (ता. 14) रात्री खून झालेल्या अमरावती येथील बांधकाम कामगाराच्या नातेवाईकांचा ठावठिकाणा अद्याप लागला नाही. यासंदर्भात कोरेगाव पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातील बडनेरा तालुक्‍यातील पोलिस पाटलांना माहिती घेण्यासंदर्भात आवाहन केले आहे.
 
कोरेगाव पोलिसांनी केलेल्या आवाहनात म्हटले आहे, की मृताचे नाव राजू दामोदर पवार (रा. अमरावती) एवढीच माहिती उपलब्ध आहे. तसेच मृताच्या पत्नीचे नाव लक्ष्मी आहे. तसेच त्याचा मुलगा पंधरा वर्षांचा किंवा पंधरावीला आहे, अशी माहिती मिळत आहे. तसेच तो बडनेरा तालुक्‍यातील अमरावतीचा असावा, अशी शक्‍यता असून, त्याच्या उजव्या हाताच्या पोटरीवर शंकराची पिंड गोंदलेली आहे. तो बिगारी, गवंडी काम करतो. 

पुणे येथे कामशेत व पुणे स्टेशन येथे एकटाच राहात होता, अशी माहिती उपलब्ध होत आहे. दरम्यान, मृताचे आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी, मुले किंवा इतर नातेवाईकांबद्दल कोणाला काही माहिती मिळाल्यास कोरेगाव पोलिस ठाणे (जि. सातारा) येथील तपासी अंमलदार सहायक पोलिस निरीक्षक साळुंके यांच्याशी (मोबाईल क्रमांक 7715973907) त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन कोरेगाव पोलिसांनी केले आहे. 

साहेबांच्या देहबोलीतूनच महाराष्ट्र झालाय खंबीर

ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळीच विवाह झाला अन् नवदाम्पत्याने मंदिरातच...

पोटच्या मुलाचा मृतदेह तीन दिवस घरातच ठेवला लपवून 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com