साताऱ्यात 78 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

78 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा - दुध डेअरीचे थकीत भाडे व उसने घेतलेली रक्कम न देता
सुमारे 78 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश जयराम निकम (रा. औद्योगिक वसाहत, सातारा) असे त्याचे नाव आहे. याबाबत राहुल विठ्ठल गायकवाड (रा. निसराळे, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. गायकवाड यांची खोडद फाटा (ता. सातारा) येथे सुरेल फुड प्रोसेसर नावाची दुध डेअरी आहे. ती त्यांनी निकम याला चालवायला दिली होती. भाड्यापोटी दर महिना एक लाख 60 हजार रुपये देण्याचे त्याने मान्य केले होते. दरम्यानच्या काळात निकमला डेअरी चालवण्यात अडचणी आल्या.

त्यामुळे त्याने गायकवाड यांच्याकडून 50 लाख रुपये उसने घेतले. त्यानंतरही त्याने भाडे देण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे सुमारे 28 लाख 30 हजार रुपयांचे भाडे थकले. या व उसने घेतलेल्या पैशासाठी ते निकमकडे वारंवार पाठपुरावा करत होते. मात्र, त्याने पैसे दिले नाहीत. त्यामुळे गायकवाड यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. उपनिरीक्षक खान तपास करत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: satara police filed case against cheating of 78 lakh rupees