साताऱ्यात चोरट्यांचा सराफी दुकानांवर डल्ला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

सातारा - शाहूपुरी चौक व मोती चौकातील सराफी दुकाने फोडून चोरट्यांनी मध्यरात्री सुमारे दोन लाख रुपये किमतीचे सोन्या- चांदीचे दागिने लंपास केले. दोन्ही दुकानांतून सुमारे सहा किलो चांदी लंपास झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास मोती चौक येथील के. नारकर ज्वेलर्स दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून दुकानातील सोन्या- चांदीचे सुमारे 97 हजार किमतीचे दागिने चोरून नेले.

चोरट्यांनी शाहूपुरी चौकातील मंगलमूर्ती ज्वेल पॅलेस या दुकानावरही याच दरम्यान डल्ला मारला. त्यांनी दुकानाचे शटर उचकटून चांदीचे सुमारे 87 हजार किमतीचे दागिने चोरून नेले. ही घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी दोन्ही घटनास्थळावर धाव घेतली. पोलिस उपअधीक्षक खंडेराव धरणे व पोलिस निरीक्षक पिसाळ यांनी घटनास्थळाची पाहणी करून ठसेतज्ज्ञ व श्‍वानपथकास पाचारण केले. श्‍वान घटनास्थळावरच घुटमळले. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात संदेश नारकर व संजय बंदरकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. भरचौकात झालेल्या दोन चोरीच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, माळवाडी रस्त्यावर आयुर्वेदिक औषधांचे दुकान आणि दवाखान्याचे शटर उचकटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. त्याचबरोबर माळवाडीतील एक कापड दुकान व आईस्क्रीम पार्लरमध्येही चोरीचा प्रयत्न झाला. मात्र, शाहूपुरी, तसेच तालुका पोलिसांकडून याबाबतच्या वृत्ताला दुजोरा मिळाला नाही.

Web Title: Satara thieves banking shops help oneself