श्रीनाथनगरातील ट्रकचालक कोरोना पॉझिटिव्ह; कोरेगाव तालुक्‍यात दोन रुग्ण

श्रीनाथनगरातील ट्रकचालक कोरोना पॉझिटिव्ह; कोरेगाव तालुक्‍यात दोन रुग्ण
Updated on

कोरेगाव : सोनकेपाठोपाठ त्रिपुटी (ता. कोरेगाव) येथील श्रीनाथनगरातील एक ट्रकचालक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने तालुक्‍यातील कोरोनाबाधितांची संख्या दोनवर पोचली आहे. त्रिपुटीमधील (श्रीनाथनगर परिसर) बाधितास काल रात्रीच जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
 
दरम्यान, गेल्या एक तारखेला घरी आल्यानंतर होम क्वारंटाइन असतानाही तो पत्ते खेळत होता, अशी माहिती पुढे आल्याने त्याच्या कुटुंबातील तिघांसह त्याच्या संपर्कात आलेल्या एकूण 26 जणांना क्वारंटाइन करण्यासाठी ब्रह्मपुरी येथे हलवले आहे. या सर्वांचे स्वॅबचे नमुने घेतले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून त्रिपुटी, भिवडीसह एक किलोमीटरचा भाग सील केला आहे.
 
त्रिपुटी गावाच्या हद्दीतील श्रीनाथनगर परिसरातील एका वस्तीवर वास्तव्यास असलेला एक ट्रकचालक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. उपलब्ध माहितीनुसार तो भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर चालक होता. परजिल्ह्यातही तो ट्रक घेऊन जात होता. गेल्या एक तारखेला तो घरी आला होता. त्यानंतर पाच तारखेला ताप आल्याने तो कोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी गेला होता. तेथे औषधे घेऊन आल्यानंतर त्याला होम क्वारंटाइन केले होते. त्यानंतर सात तारखेला त्याला ब्रह्मपुरी येथे हलवण्यात आले. त्याच्या स्वॅबचा नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आला. दरम्यान, तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल काल (शनिवार) रात्री उशिरा आला. त्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करून त्याला सातारा येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. आज सकाळपासून प्रांताधिकारी कीर्ती नलावडे, तहसीलदार रोहिणी शिंदे, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व पोलिसांनी या परिसरात तळ ठोकला आहे. बाधिताच्या पत्नीसह दोन मुलांना काल रात्रीच ब्रह्मपुरी येथे क्वारंटाइन केले आहे. दरम्यान, बाधिताच्या संपर्कात आलेल्यांची यादी तयार करण्याचे काम आज सकाळपासूनच सुरू होते. त्यानुसार 23 जणांना ब्रह्मपुरी येथे हलवण्यात आले आहे. बाधिताच्या कुटुंबातील तिघांसह 26 जणांचे स्वॅबचे नमुने घेतले आहेत. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून त्रिपुटी, भिवडी, जांब बुद्रुक ही तीन गावे सील केली आहेत. 


प्रतिबंधित क्षेत्र घोषित
 
संबंधित रुग्णाचे वास्तव्याचे ठिकाण केंद्रस्थानी ठेवून एक किलोमीटरचा परिसर म्हणजेच भिवडी व त्रिपुटी ही गावे (त्यामधील एक किलोमीटर परिसरातील वाड्या-वस्त्या धरून) प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. या क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यास व या क्षेत्रातून बाहेर पडण्यास मनाई केली आहे. या परिसरातील नागरिकांना औषधांसह जीवनावश्‍यक वस्तूंचा घरपोच पुरवठा करण्याचे आदेश प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांनी दिले आहेत. 

काेणत्या राज्याने महाराष्ट्राकडे मदतीची याचना केली आहे वाचा सविस्तर.....

घरीच रहा सुरक्षित रहा ;शाळा प्रवेशाची काळजी करु नका. सविस्तर बातमी वाचा कधी हाेणार प्रक्रिया सुरु

...त्यांची घरवापसी, गावागावांत धास्ती?

या दाेन्ही कॉन्स्टेबलनी असे काय लिहिले पत्रात चक्क महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना दखल घ्यावी लागली. काय म्हणाले आहेत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत वाचा सविस्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Red Bull Breaks the Ritual Barrier as Salgare Preserves 202-Year Bendur Tradition
Sangli Anti Corruption Bureau trap
Latest Koyna Dam storage report
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com