esakal | अखेर 'या' राज्य सरकारने मागितली महाराष्ट्रकडून मदत
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर 'या' राज्य सरकारने मागितली महाराष्ट्रकडून मदत

कर्नाटक सरकारकडून सहा टीएमसी पाणीसाठा मिळावे, अशी मागणी महाराष्ट्राकडे प्राप्त झाली आहे. राज्य शासनाच्या निर्देशांनुसार पुढील कार्यवाही होणार आहे. रिव्हर स्लुज (आपत्कालीन) दरवाजा उघडण्याची तयारी केली आहे अशी माहिती एच. व्ही. गुणाले (सदस्य, कृष्णा पाणीवाटप लवाद समिती व अधीक्षक अभियंता सांगली पाटबंधारे विभाग) यांनी दिली.

अखेर 'या' राज्य सरकारने मागितली महाराष्ट्रकडून मदत

sakal_logo
By
विजय लाड

कोयनानगर (जि.सातारा) ः पाणीटंचाईने ग्रासल्यामुळे कर्नाटकला दुष्काळ निवारणासाठी कोयना व उजनी धरणांतून सहा टीएमसी पाणी द्यावे, अशी मागणी केली आहे. कर्नाटकातील पाणीटंचाईने उग्ररूप धारण केल्याने तीन राज्यांत झालेल्या सामंजस्य करारांची अंमलबजावणी राज्य सरकार करणार आहे. त्यासाठी कोयना व उजनी धरणांतून प्रत्येकी तीन टीएमसी पाणीसाठा कर्नाटकला देण्यात येणार आहे.
 
पाणीटंचाईमुळे कर्नाटक राज्यातील जनता होरपळत आहे. पशुधनही धोक्‍यात आले आहे. हतबल झालेल्या कर्नाटक सरकारने टंचाई निवारणासाठी राज्याकडे मदतीची याचना केली आहे. राज्य सरकारने कर्नाटकातील दुष्काळ निवारणासाठी सहा टीएमसी पाणी द्यावे, अशी लेखी मागणी केली आहे. त्या बदल्यात कर्नाटक सरकार महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला अलमट्टी धरणातून पाणी देणार आहे. कर्नाटक सरकारकडून आलेल्या मागणीबाबत शासन स्तरावर विचार विनिमय सुरू आहे. कोयना धरणातून तीन, तर उजनी धरणातून तीन टीएमसी असे सहा टीएमसी पाणीसाठा कर्नाटक सरकारला देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. कोयना धरणात सध्या 44.68 टीएमसी पाणीसाठा आहे. यातील पश्‍चिमेकडील वीज प्रकल्पासाठी 60.86 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. सात टीएमसी पाण्याचा वापर करणे शिल्लक आहे. पूर्वेकडील सिंचन प्रकल्पासाठी 20.86 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. पाऊस सुरू होण्यास एक महिना शिल्लक आहे. धरणात सद्यस्थितीत मुबलक पाणीसाठा आहे.
 
पश्‍चिमेकडील वीज प्रकल्पासाठी सात टीएमसी, तर कर्नाटक राज्याला तीन टीएमसी असा दहा टीएमसी पाणीसाठा मेअखेर संपेल, तरीही कोयना धरणात 33 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहणार आहे. 


कर्नाटक सरकारकडून सहा टीएमसी पाणीसाठा मिळावे, अशी मागणी महाराष्ट्राकडे प्राप्त झाली आहे. राज्य शासनाच्या निर्देशांनुसार पुढील कार्यवाही होणार आहे. रिव्हर स्लुज (आपत्कालीन) दरवाजा उघडण्याची तयारी केली आहे. 

एच. व्ही. गुणाले, सदस्य, कृष्णा पाणीवाटप लवाद समिती, व अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे विभाग 


 

अजित पवार,जयंत पाटलांनी करुन दाखवलं; यांच्या गाेलगप्पाच

पुण्यातील डॉक्टर दांपत्य अपघातात ठार

एकदम झक्कास : तीन वर्षीय बालक कोराेनामुक्त

तब्बल 33 हजार जणांच्या जीवाला धोका?

loading image
go to top