वाई : मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई; 50 हजारांचा दंड वसूल

वाई : मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई; 50 हजारांचा दंड वसूल
Updated on

वाई : मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध पालिकेमार्फत धडक कारवाईची मोहीम सुरू झाली असून, आजपर्यंत जवळपास शंभर जणांवर दंडाची आकारणी करून 50 हजार दंड वसूल केल्याची माहिती मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी दिली. या कारवाई दरम्यान वाहनांचे नियम न पाळणाऱ्यांवरही पोलिस विभागामार्फत स्वतंत्र कारवाई करण्यात येत असल्याने वाहनधारकांनी नियम पाळण्याची काळजी घ्यावी, असेही पाेळ यांनी नमूद केले.

कोणीही व्यक्ती थुंकल्यास त्यास 1000 रुपये दंड आकारण्यात येत आहे. घराबाहेर पडताना व घरी येईपर्यंतच्या संपूर्ण कालावधीमध्ये चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक आहे, तसेच तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तीवर 500 रुपये दंड आकारण्यात येत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख गुणवंत खोपडे, आरोग्य मुकादम राहुल गाडे, रवींद्र काळोखे, उमेश कांबळे यांच्यामार्फत दंड वसुली केली जात आहे.
 
वाई शहरात बाहेरून आलेल्या व्यक्तींनी होम क्वारंटाइन आदेशाचे पहिल्यांदा उल्लंघन केल्यास 1000 रुपये दंडाची शिक्षा होणार आहे, तर दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास 2000 रुपये दंड वसूल करून संबंधितास इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये दाखल करण्यात येणार आहे. नगरपालिकेच्या वतीने आरोग्य मुकादम, स्वच्छता कर्मचारी, ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्यसेवक यांची प्रभागनिहाय पथके बनविली असून, बाहेरून आलेल्यांची तपासणी करून त्यांना होम क्वारंटाइन केले जात आहे. याच पथकांमार्फत दंड वसुलीच्या कारवायाही केल्या जाणार आहेत. 

सातारकरांनाे, दाेन दिवस पाणी येणार नाही

खून झालेल्या अमरावतीच्या कामगाराचे नातेवाईकच सापडेनात

बिदाल : क्षणांत हाेत्याचे नव्हते झाले

नशीब बलवत्तर : मायलेकींसह तिघे वाचले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Crime
Ek Bharat Shreshtha Bharat Program News
Vedika Dake Mumbai Police success story
Muslim community prayer in Sangli
Marathi News Esakal
www.esakal.com