सत्यजितसिंहांच्या शक्‍तिप्रदर्शनाने दाखवला ट्रेलर 

जालिंदर सत्रे
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

पाटण - माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी सत्काराच्या निमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांसमोर पाटणकर गटाकडून झालेले शक्तिप्रदर्शन विधानसभा निवडणूक रंगतदार होण्याच्यादृष्टीने ट्रेलर दाखवणारे ठरले. 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव पाहावा लागल्यापासून कार्यरत असणाऱ्या सत्यजितसिंहांना शरद पवार यांनी ताकद देण्याचे सूतोवाच करून २०१९ मध्ये त्यांनाच विधानसभेत पाठवण्याची घातलेली साद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना चार्ज करणारी ठरली आहे. 

पाटण मतदारसंघात २०१४ मध्ये सत्यजितसिंह पाटणकर यांचे विधानसभेसाठी लॉचिंग झाले. मात्र, १८ हजारांच्या फरकाने त्यांना पराभवाचा पाहावा लागला. मात्र, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मताधिक्‍याचा दबाव झुगारून पाटणकर गटाने विजयी मालिका सुरू ठेवली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही ती कायम राहिली. या निवडणुकांत सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाची सत्त्वपरीक्षा झाली. पंचायत समितीची बहुमतातील सत्ता व जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व मिळाल्याने सत्यजितसिंहांचे नेतृत्व तालुक्‍यात लोकमान्य झाले आहे. केंद्र व राज्यात आघाडीची सत्ता नसल्याने येणाऱ्या मर्यादांचा बागुलबुवा न करता धैर्याने परिस्थितीशी सामना केल्याने कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यात सत्यजितसिंह यशस्वी ठरले. नेहमी सत्तेत असल्याने विक्रमसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वातील संयमीपणा सर्वांच्या अंगवळणी पडला होता. संपर्काचा अभाव व संघर्षाची परंपरा नसल्याने राष्ट्रवादीतील आक्रमक कार्यकर्त्यांचा कोंडमारा होत होता. अशा परिस्थितीत २०१९ चा सामना कसा करायचा? यासाठी काल झालेल्या अमृतमहोत्सवी सत्कार कार्यक्रमास मोठे महत्त्व आहे. जमलेला जनसमुदाय व महिलांच्या लक्षणीय उपस्थितीने कार्यकर्त्यांना टॉनिक मिळाले आहे.

त्यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यक्रमास लावलेली हजेरी अनेकांच्या भुवया उंचावणारी होती. त्यांनी विक्रमसिंह पाटणकरांनी राजकीय वाटचालीत राजघराण्याचा वारसा असतानाही कधीही सरंजामशाही थाट केला केला नसल्याचे केलेले वक्तव्य बरेच काही सांगून जाते. निर्माण झालेले वातावरण, शरद पवार यांनी मंत्रिपद न मागता काम मागायला येणारा आमदार कसा असावा, यातून विक्रमसिंह पाटणकर यांचा केलेल्या गौरवाचे बळ घेऊनच संवाद व संपर्कातून सत्यजितसिंहांना २०१९ चे लक्ष्य साध्य करावे लागेल, हे निश्‍चित.

Web Title: Satyajitsinh Power Presentation Politics